सांगली शहरातून ओव्हरलोड वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:26 AM2021-04-27T04:26:56+5:302021-04-27T04:26:56+5:30
-------------- जिल्ह्यात आगीच्या घटनांत वाढ सांगली : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली. कुमठा फाटा ते तासगाव ...
--------------
जिल्ह्यात आगीच्या घटनांत वाढ
सांगली : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली. कुमठा फाटा ते तासगाव रस्त्याकडेच्या झाडांना अज्ञाताने आग लावल्यामुळे शेकडो झाडे जळाली आहेत. कवठेमहांकाळ, शिराळा, जत तालुक्यातही आगी घटना घडल्या असून, हजारो झाडे जळाली आहेत. याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
----------
कृषिपंप चोरीच्या घटनांमध्ये झाली वाढ
सांगली : मिरज तालुक्याच्या विविध भागांत कृषिपंप व शेतीसाहित्य चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अनेक शेतांतून मोटारपंप लंपास केले जात आहे. मात्र, चोरटे पोलिसांना सापडत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
----------
सांगली शहरात कचऱ्याचे साम्राज्य
सांगली : शहराच्या उपनगरामध्ये कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सर्वत्र घाण पसरली आहे. उपनगरातील कचरा उठावाकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. काही कचरा गोळा करणाऱ्या महिला कचरा जाळत आहेत, याकडे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशीही मागणी नागरिकांची होत आहे.