मिरज एमआयडीसीतील परप्रांतीय कामगाराचा झोपेत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:29 AM2021-04-28T04:29:06+5:302021-04-28T04:29:06+5:30
कुपवाड : मिरज एमआयडीसीतील वरद इंडस्ट्रीज या कंपनीतील अंजनकुमार उदय पाडी (वय ३८, मूळ गाव ओरिसा सध्या रा.मिरज ...
कुपवाड : मिरज एमआयडीसीतील वरद इंडस्ट्रीज या कंपनीतील अंजनकुमार उदय पाडी (वय ३८, मूळ गाव ओरिसा सध्या रा.मिरज एमआयडीसी) या कामगाराचा मंगळवारी सकाळी झोपेत असताना मृत्यू झाला. या घटनेची नोंद कुपवाड पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मिरज एमआयडीसीतील वरद इंडस्ट्रीज या कंपनीत ओरिसा राज्यातील काही तरुण काम करतात. ते कंपनीच्या आवारातच राहतात. मंगळवारी सकाळी अंजनकुमार हा कामगार एमआयडीसीत फिरुन येऊन खोलीत झोपला होता. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास इतर मित्रांनी त्याला झोपेतून उठवताना तो उठला नसल्याने कामगारांनी ही माहिती मालकाला फोन करून दिली.
कंपनीच्या मालकांनी अंजनकुमार याला सांगली येथे वसंतदादा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता अंजनकुमार याचा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झोपेत असताना मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समजू शकणार आहे. पोलीस तपास करीत आहेत.