राजारामबापू कारखान्याकडून दोन्ही डिग्रजला ऑक्सिजन यंत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:29 AM2021-05-25T04:29:38+5:302021-05-25T04:29:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कसबे डिग्रज : पालकमंत्री जयंत पाटील व युवा नेते प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू साखर कारखान्याच्यावतीने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : पालकमंत्री जयंत पाटील व युवा नेते प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू साखर कारखान्याच्यावतीने कसबे डिग्रज आणि मौजे डिग्रज (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात प्रत्येक दोन ऑक्सिजन यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे एकावेळी दोन रुग्णांना याप्रमाणे चार रुग्णांची ऑक्सिजनची सोय होणार आहे.
कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, बाळासाहेब पाटील यांनी ही यंत्रणा गावात उपलब्ध करून दिली. दोन्ही डिग्रजमध्ये दररोज कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यांच्याकरिता ही यंत्रे उपयोगी होतील.
कसबे डिग्रजमधील कार्यक्रमास प्रा. बाळासाहेब मासुले, उपसरपंच सागर चव्हाण, कुमार लोंढे, डॉ. शरद कुंवर, भारत देशमुख उपस्थित होते. मौजे डिग्रज येथे उद्योजक भालचंद्र पाटील यांच्या उपस्थितीत ऑक्सिजन यंत्रे आरोग्य उपकेंद्रास प्रदान करण्यात आली. यावेळी डाॅ. अस्मिता पाटील, डाॅ. चेतन सूर्यवंशी, राजाभाऊ बिरनाळे उपस्थित होते.