सांगली जिल्ह्याचा ऑक्सिजन कोटा ५४ टनांपर्यंत वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 05:26 PM2021-05-15T17:26:21+5:302021-05-15T17:32:09+5:30

CoronaVIrus Sangli : सांगली जिल्ह्याचा ऑक्सिजन कोटा दररोज ५४ टनांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्याशिवाय रेमडेसिविरदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे. शनिवारी विविध खासगी कोविड रुग्णालयांना १००० इंजेक्शन्स वितरीत करण्यात आली.

Oxygen quota of Sangli district increased to 54 tons | सांगली जिल्ह्याचा ऑक्सिजन कोटा ५४ टनांपर्यंत वाढला

सांगली जिल्ह्याचा ऑक्सिजन कोटा ५४ टनांपर्यंत वाढला

Next
ठळक मुद्देसांगली जिल्ह्याचा ऑक्सिजन कोटा ५४ टनांपर्यंत वाढलाविविध खासगी कोविड रुग्णालयांना १००० इंजेक्शन्स वितरीत

संतोष भिसे 

सांगली : जिल्ह्याचा ऑक्सिजन कोटा दररोज ५४ टनांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्याशिवाय रेमडेसिविरदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे. शनिवारी विविध खासगी कोविड रुग्णालयांना १००० इंजेक्शन्स वितरीत करण्यात आली.

जिल्ह्यात कोरोनारुग्णांचा दररोज उच्चांक होत असल्याच्या स्थितीत ऑक्सिजनची मागणी दुपटीहून अधिक वाढली आहे. मार्चमध्ये दररोज २० टनांची गरज होती, मेमध्ये ती ४५ टनांपर्यंत पोहोचली. सध्या जिल्हाभरात ८८ कोविड रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार होतात. प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था आहे. त्यामुळे मागणीही वाढली आहे.

पंधरवड्यांपूर्वी कर्नाटकच्या बेल्लारीहून पुरवठा थांबल्याने पुण्यातून उपलब्ध करण्यात आला. दररोज ४० टन ऑक्सिजन पुण्यातून मिळत होता. रुग्णसंख्या वाढत असल्याने सांगलीचा कोटा आता ५४ टनांपर्यंत वाढविण्यात आला आहे. पुणे व रायगड येथील खासगी कंपन्यांमधून पुरवठा होत आहे. दररोज चार ते पाच टँकर्स येत आहेत. जिल्ह्याची सध्याची मागणी सरासरी ४५ ते ५० टनांपर्यंत आहे, त्या तुलनेत सध्याचा पुरवठा पुरेसा ठरला आहे.

काही कोविड रुग्णालयांना परवानगी ऑक्सिजन उपलब्ध होत नाही म्हणून खोळंबली होती, ती आता मिळण्याची शक्यता आहे. मुंबई, पुण्याची रुग्णसंख्या कमी झाल्याने रेमडेसिविर इंजेक्शन्सचा कोटादेखील वाढला आहे. शनिवारी १००० मिळाली, त्याशिवाय मिरज कोविड रुग्णालयांतही स्वतंत्र साठा आहे.

मुंबई, पुण्याचे रुग्ण घटल्याचा फायदा

मुंबई आणि पुण्यातील रुग्णसंख्या घटल्याचा फायदा सांगलीला झाला आहे. या शहरांसाठी ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन्स व फेविपिरॅवीर गोळ्यांची गरज कमी झाली, त्यामुळे सांगलीला अतिरिक्त कोटा मिळाला. महिन्याभरापूर्वी सांगलीची रेमडेसिविरची दररोजची गरज १००० इंजेक्शन्सची असताना उपलब्धता मात्र १०० पेक्षाही कमी होती. आज मात्र दिवसभरात १००० इंजेक्शन्स देण्यात आली.

दृष्टीक्षेपात उपलब्धता...

  •  ऑक्सिजन - ५४ टन
  • रेमडेसिविर इंजेक्शन्स - १०००
  •  एकूण कोविड रुग्णालये - ८८


सांगलीचा ऑक्सिजन कोटा ५४ टनांपर्यंत वाढला आहे. पुणे व रायगडमधून पुरवठा होईल. त्यामुळे सध्याची गरज भागत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन्सदेखील जास्त प्रमाणात मिळत आहेत.
- नितीन भांडारकर,
सहाय्यक आयुक्त, अन्न व अ‍ौषध प्रशासन

Web Title: Oxygen quota of Sangli district increased to 54 tons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.