मिरज कोविड रूग्णालयामध्ये अतिरिक्त ऑक्सिजन टँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 05:49 PM2020-08-25T17:49:29+5:302020-08-25T17:50:43+5:30

मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये दुप्पट म्हणजेच 12 के एल अतिरिक्त क्षमतेचा ऑक्सिजनचा टँक उपलब्ध केल्याने सर्व रुग्णांना दिलासा मिळला आहे. 

Oxygen tank at Miraj Kovid Hospital | मिरज कोविड रूग्णालयामध्ये अतिरिक्त ऑक्सिजन टँक

मिरज कोविड रूग्णालयामध्ये अतिरिक्त ऑक्सिजन टँक

Next
ठळक मुद्देमिरज कोविड रूग्णालयामध्ये अतिरिक्त ऑक्सिजन टँक अतिरिक्त क्षमतेचा रूग्णांना होणार लाभ-जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली :   मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये दुप्पट म्हणजेच 12 के एल अतिरिक्त क्षमतेचा ऑक्सिजनचा टँक उपलब्ध केल्याने सर्व रुग्णांना दिलासा मिळला आहे. 

वाढत्या कोविड-19 रूग्णांच्या संख्येमुळे मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये जिल्हा प्रशासनाने व्हेंटिलेटर व विशेषतः एच. एफ. एन. ओ. या विशेष उपचार पद्धतीची सुविधा उपलब्ध करून दिली.

मिरज येथील रुग्णालयामध्ये 54 व्हेंटीलेटर व 16 एच. एफ. एन. ओ. उपकरणे गंभीर व अतिगंभीर रुग्णांच्या उपचाराकरिता उपलब्ध आहेत. तथापि, या उपकरणांना लागत असणाऱ्या ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्याकरिता ऑक्सिजनचा अतिरिक्त क्षमतेचा टँक उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे होते.

आत्तापर्यंत 6 के एल या क्षमतेचा ऑक्सीजन टँक होता. वाढती रुग्ण संख्या पाहता ऑक्सिजनची गरज प्रचंड प्रमाणात वाढल्याने जिल्हा प्रशासनाने त्याची क्षमता दुप्पट म्हणजेच 12 के एल करण्याचा निर्णय तात्काळ घेतला व अंमलबजावणी सुद्धा केली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सद्यस्थितीत मिरज येथील शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये 315 ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. यामुळे गंभीर व अतिगंभीर रुग्णांची तात्काळ व अधिक चांगल्या पद्धतीने सुरक्षित उपचार होत आहेत.

मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये गरीब तसेच गंभीर व अतिगंभीर रुग्णांचे उपचार अधिक प्रमाणात होत असल्याने शासनामार्फत आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा तात्काळ होणे अत्यंत गरजेचे होते.

ऑक्सिजन टँकची क्षमता वाढविल्यामुळे सर्व रुग्णांना ही एक दिलासा मिळणारी बाब आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी अधिक लक्ष घालून तत्पर कार्यवाही केल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

कोविड-19 ची वैश्विक साथ सुरू झाल्यानंतर मिरज कोविड रुग्णालयामध्ये आजतागायत 1796 रुग्णांना उपचार करण्यात आलेले आहेत. त्यामधील 1333 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

रुग्णांची बरे होण्याची टक्केवारी 73.55 आहे. रुग्णालयातील रिकव्हरी रेट हा राष्ट्रीय निर्देशांकापेक्षा चांगला आहे. तसेच जिल्ह्याचा मृत्युदर 3.5 टक्के असून तो राष्ट्रीय निर्देशांकच्या बरोबर आहे.

आजतागायत मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वायरल रीसर्च डिसीज लॅबोरेटरी ( श्फऊछ )मध्ये 49066 इतक्या स्वॅबच्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. त्यातील 70.78 टक्के इतके रुग्णांना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहेत व पॉझिटिव्हिटी रिपोर्टची टक्केवारी 14.24 टक्के आहे.

Web Title: Oxygen tank at Miraj Kovid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.