पूरग्रस्तांसाठी सरसावले राज्यभरातील चित्रकार - पुण्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चार दिवस चित्रप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:34 AM2019-08-18T00:34:59+5:302019-08-18T00:36:01+5:30

चित्रकार अधिक हळवा असतो. त्यामुळेच त्याच्या संवेदनशील मनातून येणाºया भावना कॅनव्हासवर आपसुकपणे उमटतात. समाजात घडणाºया घटनांचे प्रतिबिंंब हुबेहूब मांडण्याची कला चित्रकारातच असते.

Painter from across the state for flood victims | पूरग्रस्तांसाठी सरसावले राज्यभरातील चित्रकार - पुण्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चार दिवस चित्रप्रदर्शन

पूरग्रस्तांसाठी सरसावले राज्यभरातील चित्रकार - पुण्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चार दिवस चित्रप्रदर्शन

Next
ठळक मुद्देसांगली, कोल्हापुरातील लोकांना मदत

इस्लामपूर : राज्यातील नामवंत चित्रकारांनी एकत्र येत सांगली, कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी मदत करावी, या उद्देशातून पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात २२ ते २५ आॅगस्टअखेर चित्रप्रदर्शन भरवले आहे. येथे होणाऱ्या चित्रविक्रीतून जमा झालेली सर्व रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिली जाणार आहे.

चित्रकार अधिक हळवा असतो. त्यामुळेच त्याच्या संवेदनशील मनातून येणाºया भावना कॅनव्हासवर आपसुकपणे उमटतात. समाजात घडणाºया घटनांचे प्रतिबिंंब हुबेहूब मांडण्याची कला चित्रकारातच असते. परंतु आपल्याच विश्वात रमणारे, आत्ममग्न अशीच त्यांची समाजात प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. परंतु याला काही अपवादही असतात, याचाच प्रत्यय मिळाला आहे. सांगली आणि कोल्हापुरात महापुराने मोठा हाहाकार माजवला. राज्यातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महापूर वाहतोय. यामध्ये आपलाही वाटा असावा, या भावनेतून राज्यातील २५0 चित्रकार सरसावले आहेत. त्यांना एकत्रित आणण्याचे काम पुणे येथील सुरेंद्र कुडापणे, प्रसन्ना मुसळे, अस्मिता शहा, प्रणाली हरपुडे, विनया केतकर यांनी केले आहे.

या प्रदर्शनात वासुदेव कामत, मुरली लाहोटी (पुणे), सयाजी नांगरे, अन्वर हुसेन, विजय नांगरे, संपत कुटे (इस्लामपूर-सांगली), अजेय दळवी, संजीव संकपाळ, अस्मिता जगताप, नागेश हंकारे, भाऊसाहेब पाटील (कोल्हापूर), प्रमोद कुर्लेकर (सातारा), तानाजी अवघडे (कºहाड), प्रफुल्ल सावंत (नाशिक), सुधाकर चव्हाण (मुंबई) यांच्यासह राज्यातील कानाकोपºयातील २५0 दिग्गज चित्रकारांच्या चित्रांचा समावेश करण्यात आला आहे.


सर्व रक्कम मदतीसाठी
२२ ते २५ आॅगस्टअखेर पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात हे चित्रप्रदर्शन भरवले असून येथील चित्रविक्रीतून येणारी सर्व रक्कम ही सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे.

प्रदर्शनात लावण्यात येणारी अशी सुंदर चित्रे पूरग्रस्तांसाठी मोठी मदत गोळा करणार आहेत.

Web Title: Painter from across the state for flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.