पडळकरांच्या मतांमुळे प्रस्थापितांना धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 04:14 PM2019-05-25T16:14:23+5:302019-05-25T16:14:54+5:30

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात मागील तीन विधानसभा निवडणुकीत ७३ हजार ते ८० हजार मते मिळविणारा उमेदवार आमदार झाला आहे. या लोकसभा निवडणुकीत सगळे प्रस्थापित नेते भाजप आणि ‘स्वाभिमानी’च्या मागे ठामपणे उभे असताना

Pallalkar's vote shocked the proposers | पडळकरांच्या मतांमुळे प्रस्थापितांना धडकी

पडळकरांच्या मतांमुळे प्रस्थापितांना धडकी

googlenewsNext
ठळक मुद्देत्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे, तर पडळकरांचा पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे.


अविनाश बाड  । 
आटपाडी : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात मागील तीन विधानसभा निवडणुकीत ७३ हजार ते ८० हजार मते मिळविणारा उमेदवार आमदार झाला आहे. या लोकसभा निवडणुकीत सगळे प्रस्थापित नेते भाजप आणि ‘स्वाभिमानी’च्या मागे ठामपणे उभे असताना, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना खानापूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल ७८ हजार मते मिळाली. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांच्या मनात धडकी भरविणारी ही लोकसभा निवडणूक ठरली आहे.

खानापूर-आटपाडी आणि विसापूर मंडल या विधानसभा निवडणुकीचे गणित आजपर्यंत तरी प्रस्थापित नेते ज्या बाजूला, त्याच बाजूला मताधिक्य, असेच असल्याचे  स्पष्ट झाले आहे. आ. अनिल बाबर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख हे नेते संजयकाकांच्या मागे होते. त्यामुळे संजयकाकांना या विधानसभा मतदारसंघात ७९,१७९ मते मिळाली. माजी आमदार सदाशिवराव पाटील, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, स्वाभिमानी विकास आघाडीचे भारत पाटील यांच्यासह कॉँग्रेसची नेतेमंडळी ‘स्वाभिमानी’चे उमेदवार विशाल पाटील यांच्यामागे असूनही त्यांना या विधानसभा मतदारसंघात केवळ ४३,८२९ एवढी मते मिळाली.

एकही प्रस्थापित नेता मागे नसताना, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना ७८,०२४ एवढी मते मिळाली. संजयकाकांना केवळ १,१५५ मतांचे मताधिक्य पडळकरांपेक्षा जास्त आहे. विशाल पाटील यांना संजयकाकांपेक्षा तब्बल ३५,३५०, तर पडळकरांपेक्षा ३४,१९५ कमी मते मिळाली आहेत.
२००४ च्या विधानसभा निवडणुकीत सदाशिवराव पाटील ७९,८१३ मते मिळवून, तर २००९ मध्ये ७७,९६५ मते मिळवून विधानसभा निवडणूक जिंकली होती. २०१४ मध्ये ७२,८४९ मते मिळवून आमदार अनिल बाबर जिंकले होते. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिला, तर प्रस्थापित नेत्यांना अस्वस्थ करणाराच लोकसभा निवडणुकीचा हा निकाल लागला आहे, असे म्हणावे लागेल.

अर्थात प्रत्येक निवडणुकीची रंगत वेगवेगळी असते. लोकसभा निवडणुकीत तालुक्याचा उमेदवार म्हणून मतदारांनी झुकते माप दिले. मात्र विधानसभेवेळी कोण कुणासमोर उभा राहणार, कुणाला कोण पाठिंबा देणार, यावरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. हे खरे असले तरी, निवडणूक यंत्रणेचा अभाव, नेत्यांची वानवा असताना ‘वंचित’च्या पडळकरांना मिळालेली मते निदान आमदारकीची स्वप्ने पाहणाºयांना आणि त्यांच्या चेल्यांना तरी काळजीत पाडणारी आहेत यात शंका नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे, तर पडळकरांचा पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

Web Title: Pallalkar's vote shocked the proposers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.