पलूसला व्हेंटिलेटर बेड, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:28 AM2021-05-20T04:28:18+5:302021-05-20T04:28:18+5:30

अशुतोष कस्तुरे पलूस : पलूस तालुक्यात व्हेंटिलेटर बेड आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची उपलब्धता नाही. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे आवश्यक आहे. सध्या ...

Palus has ventilator beds, trained staff van | पलूसला व्हेंटिलेटर बेड, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची वानवा

पलूसला व्हेंटिलेटर बेड, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची वानवा

googlenewsNext

अशुतोष कस्तुरे

पलूस : पलूस तालुक्यात व्हेंटिलेटर बेड आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची उपलब्धता नाही. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे आवश्यक आहे.

सध्या तालुक्यात पलूसच्या ग्रामीण रुग्णालय येथे २५ ऑक्सिजन बेड आहेत; पण व्हेंटिलेटरची सोय नाही. येथे प्रशिक्षित कर्मचारी देऊन व्हेंटिलेटर उपलब्ध केले, तर अजूनही रुग्णांची मोफत सोय होईल. खासगी कोविड रुग्णालयांत ५० ऑक्सिजन बेड आणि सहा व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. येथे शासकीय दरानुसार रुग्णांवर उपचार केले जातात. समर्पित कोरोना केअर सेंटर येथे १०० बेडची सुविधा आहे; पण डॉक्टर्सची उपलब्धता नसल्याने फक्त ५० बेड कार्यरत आहेत. तेथे शासकीय दारात काहीशी सूट देऊन उपचार केले जातात. अशा एकूण १७५ ऑक्सिजन बेडची सुविधा आहे. सात व्हेंटिलेटर बेड आहेत. दोन्ही कोरोना केंद्रे तालुक्यातील डॉक्टर्स चालवीत आहेत.

तालुक्यात आजअखेर ४,६०५ कोरोना रुग्ण आहेत, तर ३,८६२ रुग्ण बरे झाले आहेत. ५९५ रुग्ण उपचाराखाली आहेत, तर आजवर १४८ रुग्ण मृत्यू पावले आहेत. लक्षणे नसणाऱ्यांना येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात ठेवले जाते. तेथील क्षमता ६० रुग्णांची आहे.

चौकट

प्रशासनाने खासगी व सरकारी आरोग्यव्यवस्थेबरोबरच सर्वच घटकांना बरोबर घेऊन, जबाबदारी वाटून देऊन ही लढाई सर्वसमावेशक करणे गरजेचे आहे.

-डॉ. अमोल पवार

Web Title: Palus has ventilator beds, trained staff van

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.