पंढरपुरातील नगरसेवकाच्या खुनाचा कट शिजला सांगलीत : दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:57 PM2018-03-23T22:57:06+5:302018-03-23T22:57:06+5:30

Panchagarh corporator's murder was cut, Sangli said: Both were arrested | पंढरपुरातील नगरसेवकाच्या खुनाचा कट शिजला सांगलीत : दोघांना अटक

पंढरपुरातील नगरसेवकाच्या खुनाचा कट शिजला सांगलीत : दोघांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्दे सोलापूर ‘एलसीबी’चे पथक पुन्हा दाखल

सांगली : पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खुनाचा कट सांगलीत शिजल्याची धक्कादायक मािहती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. सोलापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाने शुक्रवारी सांगलीत छापे टाकून मुख्य संशयित बबलू सुरवशे याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. सांगलीतील आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे.

ओंकार नंदकुमार जाधव (वय २२, रा. हिराबाग कॉर्नर, सांगली) व प्रथमेश चंद्रकांत लोंढे (२२, पी. आर. पाटील रस्ता, लोंढे चौक, सांगली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना शनिवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. यातील ओंकार पलूस येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. आतापर्यंत नऊ संशयितांना अटक झाली आहे. यातील चौघांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने ठाण्यात अटक केली आहे, तर एलसीबीने पाचजणांना अटक केली आहे.

गेल्या आठवड्यात गुढीपाडव्यादिवशी संदीप पवार यांचा भरदिवसा पंढरपुरात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. दहा ते बारा जणांनी हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे. भरदिवसा झालेल्या या खुनाचा छडा लावण्यासाठी पंढरपूर पोलिसांसह एलसीबीचे पथकही स्वतंत्रपणे तपास करीत आहे. तपासात बबलू सुरवशे हा संशयाच्या भोवºयात सापडला होता. बबलू रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या वर्तणुकीत सुधारणा व्हावी, यासाठी त्याला घरच्यांनी सांगलीत कर्नाळ रस्त्यावरील नातेवाईकांकडे ठेवले आहे. बबलूवरही गतवर्षी कर्नाळ रस्त्यावर भरदिवसा गोळीबार झाला होता. त्याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होता. यामध्ये त्याने नगरसेवक संदीप पवार यांच्यावर संशय घेतला होता. शहर पोलिसांनी याचा तपास केला.

घटनास्थळी गोळीबाराच्या पुंगळ्या कुठेही सापडल्या नाहीत. तसेच संदीप पवार घटनेवेळी पंढरपुरात असल्याचे पुरावे मिळाले होते. सुरवशे याने बनाव करुन खोटी फिर्याद दिल्याचे स्पष्ट झाल्याने त्याची तक्रार निकालात काढण्यात आली होती.

बबलू व मृत संदीप पवार यांच्यात गेल्या अनेक वर्षापासून वैमनस्य आहे. दोघांनी एकमेकांना अनेकदा बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यामुळे बबलूने पवार यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. पंधरा दिवसापूर्वी त्याने साथीदारांची सांगलीत बैठक घेतली. या बैठकीतच पवार यांच्या खुनाचा कट शिजला. यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त काढण्यात आला. बबलूसह आठ साथीदार शनिवारी रात्रीच पंढरपूरला रवाना झाले. रविवारी सकाळपासून दोघे पवार यांच्या मागावर होते. पवार चहा पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथेच त्यांची ‘गेम’ करण्याचे ठरविले. त्यानुसार पवार चहा घेऊन बाहेर येताच संशयितांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

आणखी काहीजणांची नावे निष्पन्न
बबलू पंढरपुरात आल्याची माहिती मिळताच त्याचा खुनात सहभाग असल्याची शक्यता बळावली होती. एलसीबीचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार चार दिवसापूर्वी सांगलीत आले होते. पथकाने बबलूला ताब्यात घेतले. त्यानंतर ओंकार जाधव व प्रथमेश लोंढे या दोन साथीदारांची नावे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यासाठी कुंभार यांचे पथक शुक्रवारी पुन्हा सांगलीत दाखल झाले. दोघांना पकडण्यात पथकाला यश आले. त्यांना घेऊन पथक सायंकाळी पंढरपूरला रवाना झाले. दरम्यान, सांगलीत आणखी काहीजणांची नावे निष्पन्न

 

Web Title: Panchagarh corporator's murder was cut, Sangli said: Both were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.