सांगलीत पंडित दीनदयाळ कोविड केअर सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:25 AM2021-05-16T04:25:14+5:302021-05-16T04:25:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : भाजपच्यावतीने आमदार सुधीर गाडगीळ युवा मंच संचालित पंडित दीनदयाळ कोविड केअर सेंटरचे उद्घाटन महापालिका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भाजपच्यावतीने आमदार सुधीर गाडगीळ युवा मंच संचालित पंडित दीनदयाळ कोविड केअर सेंटरचे उद्घाटन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते करण्यात आले. येथील मालू हायस्कूलमध्ये सुरू केलेले सेंटर सर्व जनतेला उपयुक्त ठरेल, असे यावेळी कापडणीस म्हणाले.
आमदार गाडगीळ म्हणाले, रुग्णांची गैरसोय होत असल्याचे पाहून कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. ज्यांच्या घरात विलगीकरणाची सोय नसेल, अशा रुग्णांसाठी हे सेंटर उभारण्यात आले आहे. येथे ५० बेडची सोय केली असून त्यापैकी १० ऑक्सिजन बेड आहेत. सात डॉक्टर आणि १० परिचारक, परिचारिका यांचे पथक २४ तास रुग्णांची देखरेख आणि औषधोपचार करण्यास सज्ज आहे. इतर कामांसाठी भाजपचे प्रमुख कार्यकर्ते दिवसभर मदतीसाठी उपलब्ध आहेत. भरती झालेल्या रुग्णांना उपचारासोबत चहा, नाष्टा, जेवणही देण्यात येणार असून सर्व सेवा पूर्णपणे मोफत आहे. पवनकुमार गायकवाड मानसशास्त्रीय समुपदेशन राेज करणार आहेत.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, शेखर इनामदार, प्रकाश बिरजे, पांडुरंग कोरे, गटनेते विनायक सिहांसने, धीरज सूर्यवंशी, स्वाती शिंदे, मुन्ना कुरणे, नगरसेवक युवराज बावडेकर, दीपक माने आदी उपस्थित होते.