पंकज पवार, मैत्रीय गोगटे विजेते

By admin | Published: June 22, 2015 12:05 AM2015-06-22T00:05:49+5:302015-06-22T00:14:49+5:30

राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

Pankaj Pawar, Maternity Gogete winners | पंकज पवार, मैत्रीय गोगटे विजेते

पंकज पवार, मैत्रीय गोगटे विजेते

Next

नृसिंहवाडी : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट व महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित राज्य मानांकन एकेरी पुरुष गटात मुंबईच्या पंकज पवारने, तर महिला गटात रत्नागिरीच्या मैत्रीय गोगटे यांनी अजिंक्यपद पटकावले.येथे गेले तीन दिवस सुरू असलेल्या राज्य मानांकन एकेरी कॅरमचे अंतिम सामने अत्यंत चुरशीचे व लक्षवेधी ठरले. पुरुष एकेरी अंतिम सामन्यामध्ये मुंबईच्या पंकज पवारने अटीतटीच्या लढतीत मुंबईच्या योगेश धोंगडेवर २५-१३ व २५-२ अशी मात केली. हा सामना जरी दोन डावामध्ये संपला असला तरी पहिल्या डावामध्ये आठ बोर्डापर्यंत दोघांची गुणसंख्या १३-१३ अशी समसमान होती. त्यामुळे पंचांनी नाणेफेकीचा कौल देऊन परत खेळण्याची संधी दिली. यामध्ये पंकज याने ब्रेक करण्याची संधी मिळवत सुयश पटकावले.महिला एकेरी अंतिम सामन्यात अपेक्षेप्रमाणे रत्नागिरीच्या मैत्रीय गोगटेने मुंबईच्या प्रीती खेडेकरवर २५-११ व २५-५ असा एकतर्फी सहज विजय मिळविला.
स्पर्धेचा अन्य निकाल - पुरुष गट, द्वितीय - योगेश धोंगडे, रियाझ अकबर अली (तृतीय), योगेश परदेशी (चतुर्थ), अनिल मुंधे (पाचवा), दिलीप सोझा (सहावा), वसंत वैराळ (सातवा), सुरेख पंडित (आठवा).
महिला एकेरी अन्य निकाल : प्रीती खेडेकर (द्वितीय), शोभा कामत (तृतीय), आसावरी जाधव (चतुर्थ), स्नेहा मोरे (पाचवा), नेत्रा चुणेकर (सहावा), मेधा मठकरी (सातवा), मीनल लेले खरे (आठवा), आदींनी सुयश मिळविले.
यावेळी विजेत्या स्पर्धकांना महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, नगरसेवक प्रकाश टोणपे, सुहास देशपांडे, भाजपचे महावीर तकडे, अशोक पुजारी, धनाजीराव जगदाळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अभिजित जगदाळे, आंतरराष्ट्रीय पंच अशिश बादकर, विजय जाधव, पंच सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र, मेडल व रोख रक्कम, आदी देण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी उपाध्यक्ष अवधूत पुजारी, रवींद्र धूपकर, सलीम शेख, भालचंद्र पुजारी, दीपक मिटके यांनी परिश्रम घेतले

Web Title: Pankaj Pawar, Maternity Gogete winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.