आरगेत झलकारी महिला ग्राम संघातर्फे परसबाग प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:17 AM2021-07-12T04:17:45+5:302021-07-12T04:17:45+5:30

राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत मिरज पंचायत समितीतर्फे महिला स्वयंसहायता समूहाकडून परसबाग लागवड करण्यात येत आहे. आरग येथे महिलांना परसबाग ...

Parasbagh demonstration by Jhalkari Mahila Gram Sangha in Arget | आरगेत झलकारी महिला ग्राम संघातर्फे परसबाग प्रात्यक्षिक

आरगेत झलकारी महिला ग्राम संघातर्फे परसबाग प्रात्यक्षिक

Next

राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत मिरज पंचायत समितीतर्फे महिला स्वयंसहायता समूहाकडून परसबाग लागवड करण्यात येत आहे. आरग येथे महिलांना परसबाग लागवडीच्या मार्गदर्शनासाठी झलकारी ग्रामसंघातर्फे परसबागेचे प्रात्यक्षिक झाले. या योजनेंतर्गत महिलांच्या पुढाकाराने पर्यावरण पूरक शेतीसाठी कीटकनाशके व रासायनिक खतांचा वापर कमी करत आपल्या परसबागेत विविध प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्यांची लागवड करण्यात येते. ग्रामसंघाच्या अध्यक्षा अधिका बाबर यांच्या परसबागेत गादीवाफे बनवून बियाणांची लागवड करण्यात आली. यावेळी शिवशक्ती, हिरकणी, संविधान, सृष्टी, सरस्वती, समर्थ या स्वयंसहायता समूहाच्या अध्यक्ष व सदस्या महिला उपस्थित होत्या. रेश्मा सातपुते यांनी मार्गदर्शन केले. रेखा खटावे, अश्विनी पाटील, सारिका कवाळे, उज्ज्वला नीळकंठ, लता कांबळे, शितल कांबळे, विना सारवाडे यानी संयोजन केले. मधुमती आवळे यांनी आभार मानले.

Web Title: Parasbagh demonstration by Jhalkari Mahila Gram Sangha in Arget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.