परभणीच्या ट्रकचालकाला सांगलीजवळ लुटले, रोकड लंपास; चौघाविरोधात गुन्हा दाखल
By शीतल पाटील | Updated: October 10, 2022 18:52 IST2022-10-10T18:51:50+5:302022-10-10T18:52:31+5:30
संशयितांनी ट्रकमध्ये दारुसाठा तसेच गांजा असल्याचे सांगून त्याला दमदाटी केली. ट्रकच्या केबीनमध्ये चढले आणि ड्रॉवरमधील ३३ हजार ५०० रुपयांची रक्कम लंपास केली.

परभणीच्या ट्रकचालकाला सांगलीजवळ लुटले, रोकड लंपास; चौघाविरोधात गुन्हा दाखल
सांगली : सांगली - इस्लामपूर रस्त्यावर ट्रकला थांबवून चार चोरट्यांनी परभणी जिल्ह्यातील चालकाकडील ३३ हजार ५०० रुपयांची रोकड लुटली. हा प्रकार काल, रविवार ९ रोजी सकाळी आठच्या सुमारास तुंग (ता. मिरज) येथे घडला. याबाबत ट्रकचालक करीम मेहबुबखान पठाण (वय २७,रा. खळी, ता.जि. परभणी ) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
करीम पठाण हे सांगलीकडून परभणीला निघाले होते. तुंग गावानजिक रविवारी सकाळी ८ वाजता चौघांनी ट्रकला हात करुन थांबवले. पठाण यांना खाली उतरण्यास सांगितले. करीम खाली उतरले असता संशयितांनी ट्रकमध्ये दारुसाठा तसेच गांजा असल्याचे सांगून त्याला दमदाटी केली. आरोपी हिंदी भाषेत बोलत होते. त्यातील दोघेजण ट्रकच्या केबीनमध्ये चढले आणि ड्रॉवरमधील ३३ हजार ५०० रुपयांची रक्कम लंपास केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून त्या चौघांचा शोध सुरू आहे.