हिंगणगाव येथील शिबिरात ५२ रक्तदात्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:24 AM2021-05-24T04:24:55+5:302021-05-24T04:24:55+5:30
कवठेमहांकाळ : हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील हनुमान सेवा मंडळाकडून आयोजित रक्तदान शिबिरात ५२ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. पोलीस निरीक्षक ...
कवठेमहांकाळ : हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील हनुमान सेवा मंडळाकडून आयोजित रक्तदान शिबिरात ५२ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.
पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सरपंच शामराव इरळे, उपसरपंच अमित लोंढे, चंद्रकांत लोंढे, शशिकांत माळी, किसन शेजाळ, शीतल पाटील, अमर सावळे, राजू इरळे, बाजीराव पाटील, विठ्ठल सगरे, गिरीश शेजाळ उपस्थित होते. ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
हिंगणगाव सेवा मंडळाचे प्रमुख विनोदकुमार पाटील, सचिन इरळे, राजेश माळी, अमित शिंत्रे, बिपिन चौगुले, सुरगोंडा पाटील, शीतल म्हेत्रे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम गावात आयोजित केला होत. डॉ. संतोष कुंभारकर, डॉ. संजय माळी, डॉ. संदीप माळी, डॉ. स्मिता इरळे यांनी विशेष सहकार्य केले.
हनुमान सेवा मंडळाने विविध समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेतले आहेत. हिंगणगाव कर्तव्य निधी, रक्तदान शिबिर असे विविध उपक्रम राबवित असताना हिंगणगावने हिवरे बाजारप्रमाणे आदर्श ग्रामनिर्मितीसाठी प्रयत्नशील व्हावे, असे पोलीस निरीक्षक शहाणे यांनी सांगितले.