कवठेमहांकाळला शिबिरात ९२ रक्तदात्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:19 AM2021-07-10T04:19:37+5:302021-07-10T04:19:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कवठेमहांकाळ : ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ : ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानात कवठेमहांकाळ तालुक्यातील तरुण रक्तदात्यांनी शुक्रवारी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण ९२ दात्यांनी रक्तदान केले.
येथील नगर पंचायतीच्या नाट्यगृहात ‘लोकमत’च्यावतीने हे शिबिर झाले. तहसीलदार बी. जे. गोरे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे यांच्या हस्ते वडाच्या रोपाला पाणी घालून आणि स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या प्रतिमापूजनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार गोरे म्हणाले की, लोकमत समूहाचा हा सामाजिक उपक्रम कोरोनाच्या महामारीत स्तुत्य ठरणार आहे. युवा नेते शंतनू सगरे, उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला, महेश पाटील, राहुल गावडे, सुनील माळी, बाळासाहेब पाटील, विजय गावडे, चंद्रशेखर सगरे, करोलीचे ग्रामपंचायत सदस्य सनी पडळकर यांनी शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
चौकट
वाढदिवस रक्तदानाने साजरा
या शिबिरात प्रज्वल पाटील या तरुणाने स्वत:चा वाढदिवस रक्तदानाने साजरा केला. काश्मीरमधून गावाकडे सुटीवर आलेल्या सागर बाबर व सुहास खैरावकर या सैन्यदलातील जवानांनीही रक्तदान केले.
यांनी केले रक्तदान
आनंद मलमे, विनायक खडतरे, संतोष वनखडे, बाबासाहेब कांबळे, महेश जाधव,