रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 'या' मार्गावरील पॅसेंजर, एक्स्प्रेस रेल्वे रद्द; ऐन सुटीच्या हंगामात गैरसोय होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 11:27 AM2023-05-29T11:27:35+5:302023-05-29T11:34:13+5:30

सुटीच्या हंगामातच दक्षिणेत जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार

Passenger and express trains running on this route have been canceled due to the megablock being taken for doubling the Londha to Miraj railway line | रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 'या' मार्गावरील पॅसेंजर, एक्स्प्रेस रेल्वे रद्द; ऐन सुटीच्या हंगामात गैरसोय होणार

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 'या' मार्गावरील पॅसेंजर, एक्स्प्रेस रेल्वे रद्द; ऐन सुटीच्या हंगामात गैरसोय होणार

googlenewsNext

मिरज : लोंढा ते मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आल्याने या मार्गावरून धावणाऱ्या पॅसेंजर व एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या एक ते दोन तास विलंबाने धावणार असल्याने मिरजेतून बेळगाव व हुबळीकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून लोंढा ते मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. रविवारपासून उगार खुर्द ते विजयनगर स्थानकापर्यंत दुहेरीकरणाच्या कामासाठी हुबळी-मिरज-हुबळी एक्स्प्रेस, मिरज-लोंढा व मिरज-कॅसलरॉक एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या सहा जूनपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. 

तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया एक्स्प्रेस ५ जूनपर्यंत मिरज व कोल्हापूर स्थानकात न येता बेळगांवातूनच तिरुपतीला जाणार आहे. कोल्हापूर-बंगळुरू राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस २९ मे पासून ६ जूनपर्यंत बंगळुरुहून दोन तास व मिरजेतून ३० मिनिटे उशिराने सुटेल. निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस मिरजेत ६० मिनिटे थांबेल. 

पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस ५ जून रोजी ४० मिनिटे व यशवंतपूर-पंढरपूर एक्स्प्रेस मिरज स्थानकावरून २ जून रोजी ६० मिनिटे उशिरा सुटणार आहे. सुटीच्या हंगामातच दक्षिणेत जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

Web Title: Passenger and express trains running on this route have been canceled due to the megablock being taken for doubling the Londha to Miraj railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.