सांगली बाजार समितीत पतंगराव-घोरपडे गटाचे मनोमीलन, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांच्या समर्थकांचेही समर्थन, संजयकाकांना केले दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 05:06 PM2018-01-01T17:06:13+5:302018-01-01T17:16:35+5:30

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती प्रशांत शेजाळ यांच्या निवडीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम आणि भाजपचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे गटात संघर्ष होऊन फाटाफूट झाली होती. मात्र आता शेजाळ यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन पदाधिकारी निवडीसाठी पतंगराव आणि घोरपडे गटाचे मनोमीलन झाले आहे.

Patangrao-Ghorpade group's Manohmilan, Vishal Patil, Jayashritya Patil's supporters support, Sanjayakakan did away with | सांगली बाजार समितीत पतंगराव-घोरपडे गटाचे मनोमीलन, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांच्या समर्थकांचेही समर्थन, संजयकाकांना केले दूर

सांगली बाजार समितीत पतंगराव-घोरपडे गटाचे मनोमीलन, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांच्या समर्थकांचेही समर्थन, संजयकाकांना केले दूर

googlenewsNext
ठळक मुद्देविशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांच्या समर्थकांचेही समर्थन, संजयकाकांना केले दूरवर्षभरापासून बाजार समितीच्या सत्ताधारी संचालकांत फूट मिरज तालुक्यास  सभापतिपदाची संधीबारा संचालक सहलीवर, काकांच्याही संपर्कात!

अशोक डोंबाळे 

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती प्रशांत शेजाळ यांच्या निवडीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम आणि भाजपचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे गटात संघर्ष होऊन फाटाफूट झाली होती. मात्र आता शेजाळ यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन पदाधिकारी निवडीसाठी पतंगराव आणि घोरपडे गटाचे मनोमीलन झाले आहे.

वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जयश्रीताई पाटील गटांचेही त्यांना समर्थन आहे. तथापी खासदार संजयकाका पाटील गटाला दूर ठेवण्यात आले आहे.

जत, कवठेमहांकाळ आणि मिरज हे तीन तालुके बाजार समितीचे कार्यक्षेत्र असल्याने सभापतीपद प्रत्येक तालुक्याला देण्याचा निर्णय यापूर्वी झाला आहे. वर्षभरापासून बाजार समितीच्या सत्ताधारी संचालकांत फूट पडली आहे. सभापतीपदी पहिल्यांदा जत तालुक्याला संधी मिळाली होती.

कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यामध्ये पद देण्यावरून मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून विशाल पाटील आणि पतंगराव कदम गटात पुन्हा मतभेद झाले होते. डॉ. कदम यांच्या नाराजीमुळे विशाल पाटील गटाला संधी न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

तत्पूर्वी विशाल पाटील गटाने संचालकांची जुळवाजुळव केली, त्यामुळे डॉ. कदम गटाला खा. संजयकाका पाटील आणि जयश्रीताई मदन पाटील गटाची मदत घ्यावी लागली. त्यानंतर सभापतीपदी शेजाळ व उपसभापती रामगोंडा संती यांची बिनविरोध निवड झाली. शेजाळ यांच्या निवडीनंतर घोरपडे आणि विशाल पाटील गट पतंगराव कदम गटापासून दुरावले होते.

आता एक वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे विद्यमान सभापती प्रशांत शेजाळ यांनी राजीनामा दिला आहे. नूतन सभापती आणि उपसभापती निवडीचा कार्यक्रम येत्या चार दिवसांत जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच बाजार समितीमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
 

नूतन पदाधिकारी निवडीवेळी बाजार समिती संचालकांमध्ये फूट पडू नये, यासाठी पतंगराव व घोरपडे गटाने बैठक घेऊन एकसंध राहण्याचा निश्चय केला आहे. या बैठकीस विशाल पाटील आणि जयश्रीताई पाटील समर्थक संचालकही उपस्थित होते.

सभापती व उपसभापती निवडीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील समर्थकांना दूर ठेवण्याचे धोरण ठरले आहे. याला संचालकांनी दुजोरा दिला आहे. भविष्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुका समोर ठेवून काँग्रेसच्या नेत्यांनी एकसंध राहून भाजपला शह देण्याची राजकीय खेळी केली आहे.


काँग्रेसच्या एकीला भाजप नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाने समर्थन दिले आहे. घोरपडे यांनी संजयकाका पाटील यांना दूर ठेवून एकत्र येण्यास सकारात्मक भूमिका घेतली आहे. बाजार समितीमधील काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्या एकीचे जत, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यातील राजकारणाला बळ मिळणार आहे. परंतु, काँग्रेसमधील सर्व गटांची एकी भविष्यात कायम राहील का, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कवठेमहांकाळ नगरपालिका निवडणुका पतंगराव कदम गट आणि भाजपचे संजयकाका पाटील गटाने तडजोडी करून लढविल्या होत्या. त्यावेळीपासून पतंगराव आणि संजयकाकांचेही सूर जमले होते. बहुतांशी कार्यक्रमातही पतंगराव आणि संजयकाका एकत्र दिसत होते. संजयकाकांच्या मध्यस्थीने बाजार समितीत भाजपच्या नेत्यांनीही हजेरी लावली होती.
 

जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख या नेत्यांच्या साक्षीने संजयकाकांनी पतंगरावांना कायमस्वरूपी बाजार समितीत साथ देण्याचे आवाहन केले होते. संजयकाकांनी दोन्ही कार्यक्रमात अजितराव घोरपडेंवर सडकून टीका केली होती. पतंगराव-संजयकाका यांच्यातील एकीमुळे दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा येईल, असे वाटत नव्हते. पण, नूतन पदाधिकारी निवडीत काँग्रेसच्या सर्व गटांनी आणि अजितराव घोरपडे समर्थक संचालकांनी एकत्र येऊन संजयकाकांना दूर ठेवण्याची सूचना मांडली.

संचालकांच्या सूचनेला काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आणि घोरपडे यांनीही सहमती दिले आहे. नेत्यांच्या मनोमीलनानंतर लगेच बाजार समितीमधील बारा संचालक कर्नाटकच्या सहलीवर गेले आहेत. बाजार समिती सभापती निवडीदिवशीच हे संचालक परत येणार आहेत. बाजार समिती बदलाच्या निमित्ताने मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

मिरज तालुक्यास सभापतिपदाची संधी

जत, कवठेमहांकाळ तालुक्यानंतर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाची संधी आता मिरज तालुक्याला मिळणार आहे. यामध्ये सभापतिपदाच्या शर्यतीत काँग्रेसचे दिनकर पाटील, वसंतराव गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुमार पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

असे असले तरीही अजितराव घोरपडे गटाचे जीवन पाटील, दीपक शिंदे यांच्या नावांचाही विचार होऊ शकतो. त्यामुळे पदांच्या या शर्यतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारा संचालक सहलीवर

संतोष पाटील, रामगोंड संती, अभिजित चव्हाण, अजित बनसोडे, दिनकर पाटील, वसंतराव गायकवाड, जयश्री यमगर, जीवन पाटील, दीपक शिंदे, अण्णासाहेब कोरे, दयगोंड बिराजदार, अण्णासाहेब कोरे, कुमार पाटील आदी संचालक कर्नाटकच्या सहलीवर गेले आहेत. जीवन पाटील शनिवारी परत सांगलीला आले असून, ते पुन्हा उर्वरित संचालक व विद्यमान सभापती प्रशांत शेजाळ यांना घेऊन जाणार आहेत. हे संचालक निवडीच्या दिवशीच सहलीवरून परत येणार आहेत.

काकांच्याही संपर्कात!

बाजार समितीमध्ये सध्या खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाचा एकही संचालक नाही. पण, अप्रत्यक्षरित्या काही संचालक त्यांच्या संपर्कात आहेत. यामुळे बाजार समिती सभापती निवडीमध्ये अचानक काहीही घडामोडी घडू शकतात, अशी चर्चा बाजार समितीमध्ये रंगली आहे.

बाजार समितीमधील पक्षीय बलाबल

पतंगराव कदम गट : प्रशांत शेजाळ, संतोष पाटील, रामगोंड संती, अभिजित चव्हाण, अजित बनसोडे
जयश्रीताई मदन पाटील गट : दिनकर पाटील, वसंतराव गायकवाड
अजितराव घोरपडे गट : तानाजी पाटील, जयश्री यमगर, जीवन पाटील, दीपक शिंदे.
विशाल पाटील गट : अण्णासाहेब कोरे
स्वाभिमानी शेतकरी संघटना : कुमार पाटील
व्यापारी गट : मुजीर जांभळीकर, शीतल पाटील
हमाल गट : बाळासाहेब बंडगर
जनस्वराज्य गट : दयगोंड बिराजदार

Web Title: Patangrao-Ghorpade group's Manohmilan, Vishal Patil, Jayashritya Patil's supporters support, Sanjayakakan did away with

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.