पतंगराव कदम सेंटरमुळे बालरुग्ण कक्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:31 AM2021-05-25T04:31:22+5:302021-05-25T04:31:22+5:30
ओळी : येथील पतंगराव कदम कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित बालकांसाठी नव्याने कक्ष सुरू करण्यात आला आहे. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली ...
ओळी : येथील पतंगराव कदम कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित बालकांसाठी नव्याने कक्ष सुरू करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाचा संसर्ग लहान मुलांतही वाढत चालला आहे. जिल्ह्यातील अनेक बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. आता त्यांच्या उपचारासाठी डाॅ. पतंगराव कदम कोविड सेंटरमध्ये बालरुग्ण कक्ष सुरू करण्यात आला. नगरसेवक अभिजित भोसले यांच्या पुढाकाराने कोविड सेंटरमध्ये नव्याने २५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच नगरसेवक भोसले यांनी पुढाकार घेत हनुमानगर येथील शाळेत ३५ बेडचे कोविड सेंटर सुरू केले. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन झाले. गत महिनाभर या सेंटरमध्ये कोरोनाबाधितांवर मोफत उपचार केले जात आहेत. रुग्णांना मोफत जेवणही दिले जात आहे. आता बालकांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे.
सध्या बालकांनाही कोरोनाचा धोका वाढला आहे. पतंगराव कदम कोविड सेंटरमध्ये सध्या ८ लहान मुले उपचारासाठी दाखल आहेत. बालरोगतज्ज्ञ डॉ. सुकुमार गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांवर उपचार केले जात आहेत. गावडे यांनी कोविड सेंटरसाठी मोफत सेवा बजाविली आहे. बालकांची वाढती संख्या लक्षात घेऊन या सेंटरमध्ये नव्याने २५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनीही या कामाचे कौतुक केले आहे.