Maharashtra Vidhan Sabha 2019 : लढतींच्या मैदानातही पतंगराव कदमच सरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 04:14 PM2019-10-11T16:14:56+5:302019-10-11T16:17:58+5:30

विधानसभा निवडणुकीच्या मैदानात जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका लढविण्याचा विक्रम काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्याच नावावर आहे. त्यांनी एकूण आठ विधानसभा निवडणुका लढविल्या. त्यात एका पोटनिवडणुकीचाही समावेश आहे.

Patangrao Kadam is a mustard in the battlefield too | Maharashtra Vidhan Sabha 2019 : लढतींच्या मैदानातही पतंगराव कदमच सरस

Maharashtra Vidhan Sabha 2019 : लढतींच्या मैदानातही पतंगराव कदमच सरस

Next
ठळक मुद्देलढतींच्या मैदानातही पतंगराव कदमच सरस जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका लढविण्याचा विक्रम

शीतल पाटील 

सांगली : विधानसभा निवडणुकीच्या मैदानात जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका लढविण्याचा विक्रम काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्याच नावावर आहे. त्यांनी एकूण आठ विधानसभा निवडणुका लढविल्या. त्यात एका पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. त्याखालोखाल जयंत पाटील, आर. आर. पाटील, अजितराव घोरपडे, अनिल बाबर, संभाजी पवार, प्रा. शरद पाटील यांनी आतापर्यंत सहावेळा निवडणूक लढविली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढला आहे. १९६२ पासून २०१४ पर्यंत विधानसभा निवडणुकीचा आलेख पाहता, सर्वाधिक आठ निवडणुका पतंगराव कदम यांनी लढविल्या आहेत. १९७८ ला पहिल्यांदा ते विधानसभेच्या मैदानात अपक्ष म्हणून उतरले होते. त्यानंतर १९८० च्या निवडणुकीत ८६ मतांनी त्यांचा पराभव झाला.

१९८५ ला मात्र त्यांनी संपतराव चव्हाण यांचा पराभव करीत विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर १९९० मध्येही ते विजयी झाले. १९९५ मध्ये त्यांचा संपतराव देशमुख यांनी पराभव केला; तर वर्षभराने झालेल्या पोटनिवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. १९९९ ते २०१४ या कालावधीतील सर्व निवडणुकीत मात्र पतंगराव कदम यांनी बाजी मारली.

राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर १९९० मध्ये जयंत पाटील यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढविली. त्यानंतर आजअखेर त्यांनी सहा निवडणुका वाळवा मतदारसंघातून जिंकल्या आहेत. दिवंगत नेते आर. आर. पाटील, अनिल बाबर हेही याचवर्षी विधानसभेत पोहोचले होते. या दोघांनीही सहा निवडणुका लढल्या.

कवठेमहांकाळ मतदारसंघातून अजितराव घोरपडे १९८५ पासून निवडणुका लढत आहेत. आतापर्यंत त्यांनी सहा निवडणुका लढविल्या आहेत. त्यांना यश मिळण्यास १९९५ पर्यंत वाट पाहावी लागली. त्यानंतर १९९९, २००४ मध्ये पुन्हा निवडून आले. २००९ ला मतदार संघाची पुनर्रचना होऊन तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ तयार झाला. तेव्हा त्यांनी निवडणूक लढविली नाही. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत ते पुन्हा मैदानात उतरले, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

आर. आर. आबांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक बिनविरोध झाली. आता पुन्हा ते नशीब अजमावत आहेत. भाजपचे खासदार संजय पाटील यांनीही दोनदा विधानसभा निवडणूक लढवली, पण त्यात त्यांना यश आले नाही.

संभाजी पवार, प्रा. शरद पाटील यांनीही सहावेळा विधानसभा निवडणूक लढविली. पवार यांना १९९९ व २००४ मध्ये पराभव स्वीकारावा लागला, तर २००९ मध्ये पुन्हा ते भाजपच्या चिन्हावर विजयी झाले. २०१४ मध्ये त्यांचे पुत्र पृथ्वीराज पवार मैदानात होते.

प्रा. शरद पाटील हेही १९८५ पासून निवडणुका लढवित आहेत. १९९० व १९९५ मध्ये ते विजयी झाले, तर एकदा पदवीधर मतदारसंघातून ते आमदार झाले होते. याशिवाय शिवाजीराव नाईक, उमाजी सनमडीकर यांनी पाचवेळा, तर मदन पाटील, पृथ्वीराज देशमुख, मानसिंगराव नाईक, शिवाजीराव देशमुख, विलासराव शिंदे यांनी चारवेळा विधानसभेची निवडणूक लढविली आहे.

Web Title: Patangrao Kadam is a mustard in the battlefield too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.