पतंगराव कदम हे ज्ञानाचे चैतन्यपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:22 AM2021-01-09T04:22:15+5:302021-01-09T04:22:15+5:30
कडेगाव : माणसाला मृत्यू असतो आणि ग्रंथाला आयुष्य असते. डॉ. पतंगराव कदम हे मानवतेचे महामेरू होते. त्यांच्या आठवणी अनेकांच्या ...
कडेगाव : माणसाला मृत्यू असतो आणि ग्रंथाला आयुष्य असते. डॉ. पतंगराव कदम हे मानवतेचे महामेरू होते. त्यांच्या आठवणी अनेकांच्या काळीज कप्प्यात आहेत. त्यांच्या त्या चिरंतन, चैतन्यदायी आठवणींचा ग्रंथ प्रकाशित व्हावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.
कडेगाव येथे मातोश्री बायबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या ७७व्या जयंतीनिमित्त यशवंत पाटणे यांचे व्याख्यान झाले.
यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्राचार्या सुलक्षणा कुलकर्णी,
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख
नितीन माने आदी उपस्थित होते.
यशवंत पाटणे म्हणाले. पतंगराव कदम यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर शिक्षण, शेती आणि सहकार क्षेत्रात विकासपर्व उभे केले. त्यांनी समाजहिताचा विचार कृतीत आणताना निर्धार आणि निर्भयता दाखवली. कामाची सचोटी आणि माणसे सांभाळण्याची
हातोटी ही त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाची हातोटी होती.
यावेळी भारती विद्यापीठाच्या विविध शाखांतील शिक्षक, शिक्षकेतर
कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपास्थित होते.
चौकट
सांगलीने दिली पंचपीठे
यावेळी पाटणे म्हणाले, सांगली जिल्ह्याने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला पंचपीठे दिली आहेत. यात यशवंतराव चव्हाण हे विचारपीठ, वि. स. पागे हे संत शक्तिपीठ, वसंतदादा पाटील हे लोकपीठ, आर. आर. पाटील हे शांतिपीठ, तर डॉ. पतंगराव कदम हे ज्ञानाचे चैतन्यपीठ होते.
फोटो : फाेटाे येणार आहे.
ओळ : कडेगाव येथील मातोश्री बयाबाई कदम कन्या महाविद्यालय येथे डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त जेष्ठ साहित्यीक प्राचार्य यशवंत पाटणे यांनी मार्गदर्शन केले.