सांगली जिल्ह्यातील रस्त्यांचे पॅचवर्क पूर्णत्वाकडे : एस. एच. मुजावर यांच्याशी साधलेला हा संवाद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:01 AM2017-12-16T00:01:28+5:302017-12-16T00:02:24+5:30

सांगली-मिरजेबाहेरून येणाºया आणि महापालिका क्षेत्राला जोडणाºया बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य होते

 The patchwork of roads in Sangli district is complete: S. H. This dialogue with Mujawar ... | सांगली जिल्ह्यातील रस्त्यांचे पॅचवर्क पूर्णत्वाकडे : एस. एच. मुजावर यांच्याशी साधलेला हा संवाद...

सांगली जिल्ह्यातील रस्त्यांचे पॅचवर्क पूर्णत्वाकडे : एस. एच. मुजावर यांच्याशी साधलेला हा संवाद...

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांची डेडलाईन पाळण्यात बांधकाम विभाग यशस्वी

सांगली-मिरजेबाहेरून येणाºया आणि महापालिका क्षेत्राला जोडणाºया बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य होते. पावसाळा, गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळीच्या सणातही खड्डेमय रस्त्यांतूनच जावे लागले होते. या खड्ड्यांविरोधात कृती समितीसह जनतेने आंदोलन हाती घेतले. त्यानंतर १५ डिसेंबरची डेडलाईन देऊन खड्डेमुक्तीचे अभियान सुरू झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील बहुतांश रस्त्यांवर पॅचवर्कचे काम पूर्ण होत आले आहे. आता त्याच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या जात असल्या तरी, किमान खड्डेमुक्तीकडे पाऊल टाकण्यात या विभागाला यश आले. खड्डेमुक्तीसह विविध विषयांवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस. एच. मुजावर यांच्याशी साधलेला हा संवाद...

प्रश्न : आपल्या विभागाकडील रस्त्यांवरील खड्डेमुक्ती कुठंपर्यंत आली?
उत्तर : पावसाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीखालील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले होते. पावसाळ्यानंतर दिवाळीच्या सुमारास पॅचवर्कचे काम हाती घेतले. काही रस्त्यांवर काम सुरूही झाले. पण पुन्हा पाऊस पडल्याने ते थांबले. त्यात सामाजिक संघटनांनी आंदोलन पुकारले होते. जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खड्डेप्रश्नी बैठक झाली. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला १५ डिसेंबरपर्यंतची डेडलाईन देण्यात आली होती. एक महिन्याच्या कालावधित पॅचवर्कचे काम गतीने करून खड्डेमुक्त रस्ते करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हाधिकाºयांची डेडलाईन पाळण्यात यश आले.
प्रश्न : पॅचवर्कच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्याबाबत काय सांगाल?
उत्तर : पॅचवर्कचे काम हाती घेतल्यानंतर संबंधित एजन्सीला, दर्जाबाबत तडजोड करू नये, असे आदेश दिले होते. ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतून तो रस्ता जातो, त्या ग्रामपंचायतीला पॅचवर्कच्या कामावर लक्ष ठेवण्याची सूचना केली होती. आमचे दोन अधिकारी दररोज या कामाची जागेवर जाऊन समक्ष पाहणी करीत होते. खड्डा मुजविताना तो चौकोनी करून त्यावर डांबरी पॅचवर्क करण्यात आले आहे. त्यातून काही ठिकाणी दर्जाहीन पॅचवर्क झाले असेल, तर ते दुरूस्त करून घेऊ. पॅचवर्कचे काम चांगले झाल्याबद्दल ग्रामपंचायतींनीही आम्हाला पत्रे दिली आहेत. खड्डेमुक्तीबरोबरच नवीन रस्त्यांच्या कामांनाही सुरूवात होत आहे. शासकीय निधी, आमदार फंडातील कामांच्या निविदा काढल्या आहेत.
प्रश्न : पॅचवर्कची निविदा काढली, की जुन्या ठेकेदारांकडून काम करून घेतले? त्यासाठी लागणाºया निधीची व्यवस्था काय केली?
उत्तर : पावसाळ्यानंतर अनेक रस्ते खराब झाले होते. कार्यकारी अभियंता देवेंद्र जाधव यांनी, खड्ड्यांमुळे अपघात होण्यापूर्वी खड्डेमुक्तीचा निर्णय घेतला होता. रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारांकडे आहे. त्यामुळे ज्यांची मुदत संपलेली नाही, त्यांना तातडीने पॅचवर्कचे काम हाती घेण्याच्या सूचना केल्या. काही ठेकेदारांनी थोडा वेळ मागून घेतला. तेथे आम्ही खडी, डांबर व इतर साहित्य घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच खड्डे मुजविले. त्याचा खर्च मात्र संबंधित ठेकेदाराकडून घेतला जाणार आहे. त्यामुळे माझ्या विभागातील रस्त्यांवरील खड्डेमुक्तीसाठी स्वतंत्र निधीची गरज भासली नाही.
प्रश्न : सांगली-पेठ रस्त्यावरून आंदोलनाची ठिणगी पडली. हा रस्ता दुरूस्त झाला का?
उत्तर : सांगली-पेठ रस्त्यावरील सांगली ते तुंगपर्यंतचा भाग आमच्याकडे येतो. तुंगपर्यंत खड्डे मुजविले आहेत. नव्याने काही खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. तेही मुजविले जातील. हा रस्ता राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला आहे. त्याच्या नूतनीकरणाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच उर्वरित प्रक्रिया पूर्ण होऊन चांगला रस्ता तयार होईल.
- शीतल पाटील

Web Title:  The patchwork of roads in Sangli district is complete: S. H. This dialogue with Mujawar ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.