महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाची नोंद पाथरपुंजला; कोयना, नवजा, महाबळेश्वरला टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 11:58 AM2024-08-01T11:58:20+5:302024-08-01T11:58:44+5:30

विकास शहा शिराळा (जि. सांगली ) : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज (ता. पाटण, जि. सातारा) येथील पावसाने पाच ...

Patharpunj recorded the highest rainfall in Maharashtra; Koyna, Navja, Mahabaleshwar left behind | महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाची नोंद पाथरपुंजला; कोयना, नवजा, महाबळेश्वरला टाकले मागे

महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाची नोंद पाथरपुंजला; कोयना, नवजा, महाबळेश्वरला टाकले मागे

विकास शहा

शिराळा (जि.सांगली) : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज (ता. पाटण, जि. सातारा) येथील पावसाने पाच हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. पर्जन्यमानात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्वर व वलवण या चारही अतिपावसाच्या ठिकाणांना मागे टाकले आहे.

सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज व वलवण येथे आतापर्यंत सर्वाधिक पाऊस पडला आहे. पूर्वी कोयनानगर (जि.सातारा) येथील पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक पावसाची नोंद होत. मात्र, २०१९ पासून वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाची नोंद होत आहे.

अभयारण्यातील गाव

पाथरपुंज हे कोयना विभागाच्या दक्षिण टोकावरील चांदोली अभयारण्यात येणारे हे गाव आहे. या ठिकाणी उच्चांकी पडणाऱ्या पावसाचे पाणी धरणातील ‘वसंत सागर’ जलाशयात येते. त्यामुळे चांदोली धरणातील सद्य:स्थितीतील पाणीसाठा ८५ टक्के असून, जादा पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पाथरपुंज येथील एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये
२०१४-१५ - ६,९६८
२०१५-१६ - ४,०८०
२०१६-१७ - ७,१७५
२०१७- १८ - ६,२९०
२०१८-१९ - ५,५५०
२०१९-२० - ९,९५६
२०२०-२१ - ६,४३३
२०२१-२२ - ७,०२३
२०२२-२३ - ६,९६८
२०२३-२४ - ५,०३८(आजअखेर)

“चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या पाथरपुंज, निवळे, धनगरवाडा येथे होणाऱ्या पावसामुळे हे धरण भरले आहे. पाथरपुंज येथे एक जून ते ३१ जुलैअखेर ५,०३८ मिलिमीटर सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.” - मिलिंद किटवाडकर, उपअभियंता, चांदोली धरण.

Web Title: Patharpunj recorded the highest rainfall in Maharashtra; Koyna, Navja, Mahabaleshwar left behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.