Sangli: पाथरपुंजला पर्जन्यमापन यंत्रणा पुन्हा कोलमडली, पूर्वीप्रमाणे मॅन्युअल नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 04:08 PM2023-07-20T16:08:29+5:302023-07-20T16:08:44+5:30

दोन वर्षांपूर्वी पाथरपुंज येथील पावसाने चेरापुंजीचा विक्रम मोडला आहे

Patharpunjla rain gauge system collapsed again | Sangli: पाथरपुंजला पर्जन्यमापन यंत्रणा पुन्हा कोलमडली, पूर्वीप्रमाणे मॅन्युअल नोंद

Sangli: पाथरपुंजला पर्जन्यमापन यंत्रणा पुन्हा कोलमडली, पूर्वीप्रमाणे मॅन्युअल नोंद

googlenewsNext

शिराळा : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे पाऊस मोजण्यासाठीची यंत्रणा वनविभागाने पूर्ववत बसवली; परंतु पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे नोंदी घेण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे मॅन्युअल नोंद घ्यावी लागते.

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज व निवळेत पाऊस जास्त पडतो. दोन वर्षांपूर्वी पाथरपुंज येथील पावसाने चेरापुंजीचा विक्रम मोडला आहे.

पाथरपुंजची पर्जन्यमापन यंत्रण वनविभागाच्या हद्दीत आहे. वनविभागाच्या कार्यालयाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे ही आधुनिक यंत्रणा वनविभागाने काढून ठेवली होती. आता येथील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

त्यामुळे यंत्रणा पुन्हा बसविण्यात आली; परंतु पावसाचे वाढते प्रमाण आणि ढगाळ वातावरणामुळे नोंदी घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे येथील पावसाची नोंद पूर्वीसारखी मॅन्युअल घ्यावी लागत आहे. ढगाळ वातावरण व पावसाचे जास्त प्रमाण यामुळे उपग्रहावर पावसाची नोंद मिळाली नाही.

Web Title: Patharpunjla rain gauge system collapsed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.