आष्ट्यात विलगीकरण केंद्रातील रुग्णांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:21 AM2021-05-29T04:21:48+5:302021-05-29T04:21:48+5:30
आष्टा : आष्टा शहरात कोरोना रुग्णांची संख्या ६०३पर्यंत गेली आहे. कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी गृह अलगीकरणाऐवजी विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल ...
आष्टा : आष्टा शहरात कोरोना रुग्णांची संख्या ६०३पर्यंत गेली आहे. कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी गृह अलगीकरणाऐवजी विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल येथील विलगीकरण केंद्रात उपचार घ्यावेत, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले आहे.
आष्टा शहरात १ जानेवारीपासून ६०३ रुग्ण झाले आहेत. त्यातील सक्रिय रूग्ण २१५ आहेत. शहरात सध्या १६१ रुग्ण गृह अलगीकरणामध्ये आहेत. १७९ कुटुंबातील रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे. काही रुग्ण गृह अलगीकरणामध्ये असतानाही घराबाहेर पडत असल्याने ते सुपर स्प्रेडर ठरत आहेत. घरामधील एकाला कोरोना झाल्यानंतर इतर नातेवाईकांनी पालिकेच्या विलासराव शिंदे हॉल येथील विलगीकरण केंद्रात उपचार घ्यावेत, असे आवाहन मुख्याधिकारी चव्हाण यांनी केले आहे.
दरम्यान, विलगीकरण केंद्रात १२ रुग्णांनी प्रवेश घेतला आहे. नगरपालिका, ग्रामीण रुग्णालय व आष्टा डॉक्टर्स असोसिएशनचे डॉक्टर याठिकाणी सेवा देत आहेत. आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे, डॉ. प्रकाश आडमुठे, डॉ. प्रवीण कोळी, सचिन मोरे, डॉ. प्रज्ञा खोत प्रयत्नशील आहेत.
फोटो : आष्टा येथील विलासराव शिंदे विलगीकरण केंद्रातील रुग्णांची तपासणी डॉ. प्रवीण कोळी यांनी केली. यावेळी वैभव शिंदे, सचिन मोरे, आदी उपस्थित होते.