क्रांती स्कूलचा पॅटर्न पथदर्शक ठरेल : किरण लाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:28 AM2021-04-07T04:28:21+5:302021-04-07T04:28:21+5:30
पलूस : क्रांती इंटरनॅशनल स्कूलने कोरोनाच्या काळातही सामाजिक बांधिलकी जपत शाळा सुरू ठेवून ऑनलाइन आणि ऑफलाईन शिक्षण दिले. दर्जेदार ...
पलूस : क्रांती इंटरनॅशनल स्कूलने कोरोनाच्या काळातही सामाजिक बांधिलकी जपत शाळा सुरू ठेवून ऑनलाइन आणि ऑफलाईन शिक्षण दिले. दर्जेदार शिक्षणामुळे पालकांचा ओढा या शाळेकडे वाढला आहे. भविष्यात डिजिटल शाळा म्हणून ही शाळा लौकिकास येईल, असे प्रतिपादन क्रांती इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष किरण लाड यांनी केले.
कुंडल (ता. पलूस) येथील क्रांती इंटरनॅशनल स्कूलमधील अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची माहिती देताना ते बोलत होते. यावेळी रणजित लाड, मुख्याध्यापक दत्तप्रसाद मिठारे, संतोष मेनन उपस्थित होते.
लाड म्हणाले, शाळेत अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण दिले जाते. सीबीएससीचे संलग्नीकरण झालेली तालुक्यातील ही पहिली शाळा आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांना सर्व सुरक्षेची जबाबदारी पाळून विद्यादान केले. नुसते विद्यादान न करता ते दर्जात्मक शिक्षण दिले. यासाठी प्रात्यक्षिकांवर भर दिला. या स्कूलचा शैक्षणिक पॅटर्न त्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी डोळ्यासमोर ठेवून तयार केला जातो. त्यामुळे भविष्यात हा पॅटर्न पथदर्शक ठरेल. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंना नेहमी वाटायचे की माफक फीमध्ये अत्त्युच्च इंग्रजी शिक्षण सामान्य कुटुंबातील मुलांना मिळाले पाहिजे. यासाठी क्रांती इंटरनॅशनल स्कूल काम करत आहे. शाळेत स्पर्धा परीक्षा आणि जेईई, नीट, सीईटीसारख्या स्पर्धा परीक्षांचाही सराव घेतला जातो. या शाळेतून देश सेवेतील उच्चपदस्थ अधिकारी उदयास येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.