पवारांनी ‘जीप बंड’चे साक्षीदार पुढे आणावेत

By Admin | Published: July 16, 2015 11:26 PM2015-07-16T23:26:03+5:302015-07-16T23:26:03+5:30

सर्वोदय कारखाना वाद : पी. आर. पाटील यांचे प्रतिआव्हान

Pawar has brought forward the Jeep bund | पवारांनी ‘जीप बंड’चे साक्षीदार पुढे आणावेत

पवारांनी ‘जीप बंड’चे साक्षीदार पुढे आणावेत

googlenewsNext

इस्लामपूर : पृथ्वीराज पवारांनी ज्या ‘जीप बंड’ घटनेचा उल्लेख केला आहे, त्याचे साक्षीदार त्यांनी पुढे आणून हे प्रकरण सिध्द करावे, मी राजकारण सोडायला तयार आहे़ मात्र ते तसे करू शकत नसतील, तर त्यांनी आपला ‘बालिशपणा’ थांबवावा, या शब्दात राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील यांनी पवारांना फटकारले़
राजारामबापूंच्या निधनानंतर पाटील यांनी एका जीपसाठी बंड केले होते आणि या घटनेचे बरेच साक्षीदार आहेत, अशी व्यक्तिगत टीका करून, पाटील यांनी मुद्द्याचे बोलावे, असे आवाहन पवार यांनी केले होते़ त्यास प्रत्युत्तर देताना पी. आर. पाटील बोलत होते़. ते म्हणाले, मी, राजारामबापू आणि आमदार जयंत पाटील यांच्याशी माझ्या निष्ठा वाहिल्या आहेत. ४७ वर्षांत त्या कधीही ढळू दिलेल्या नाहीत़ एखाद्या जीपसाठी बंड करणे सोडाच, परंतु हा विचारही माझ्यासारख्याच्या मनाला शिवू शकत नाही़ बापूंनी १९६८ मध्ये मला वयाच्या २३ व्या वर्षी कारखान्याच्या पहिल्या शासननियुक्त संचालक मंडळात संधी दिली़ बापू हयात असेपर्यंत मी संचालक मंडळात होतो़ जयंत पाटील यांनीही संधी दिली़ २0 वर्षे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहे़ इतक्या वर्षात मी गाडीशिवाय कोणतीही सोय व सवलत घेतलेली नाही़ (वार्ताहर)

‘सर्वोदय’ची टीका-टिपणी विषय संपला
मी १९९५ मध्ये कारखान्याचा अध्यक्ष होईपर्यंत माझ्या स्वत:च्या स्कूटरने कारखान्यावर येत-जात होतो़ मी २७ वर्षे सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात स्कूटरनेच फिरलो आहे़ याचे असंख्य साक्षीदार आहेत़ बंड वगैरे ही माझी प्रवृत्ती आणि संस्कृती नाही़़ त्यांनी वडीलधाऱ्यांबद्दल बोलताना काही पथ्ये बाळगायला हवीत़ ‘सर्वोदय’ हा काही माझा व्यक्तिगत विषय नाही़ माझ्यादृष्टीने ‘सर्वोदय’चा विषय संपलेला असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Pawar has brought forward the Jeep bund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.