पगार द्या, नाही तर पाणीपुरवठा बंद करतो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:30 AM2021-08-12T04:30:55+5:302021-08-12T04:30:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : थकबाकीसह सातव्या वेतन आयोगानुसार वेतनासाठी प्रादेशिक नळपाणी योजनांच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : थकबाकीसह सातव्या वेतन आयोगानुसार वेतनासाठी प्रादेशिक नळपाणी योजनांच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. कासेगाव, जनुे खेड-नवे खेड, नांद्रे-वसगडे, तुंग-बागणी, कुंडल व वाघोली योजनांचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलकांनी सांगितले की, जिल्हा परिषदेने पाच महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. २०१६ पासून निवृत्त झालेल्यांना कोणतेही लाभ दिलेले नाहीत. सहाव्या वेतन आयोगातील फरकही दिलेला नाही. आंदोलकांनी मागणी केली की, दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत वेतन मिळावे तसेच सातवा वेतन आयोगही तात्काळ लागू करावा. या मागण्यांवर आठवडाभरात सकारात्मक कार्यवाही झाली नाही तर सर्व पाणीयोजना बंद ठेवल्या जातील.
आंदोलनात मनोज एडके, विलास भोसले, नूरमहमद मुजावर, शकील जमादार, बाळकृष्ण येवले, शकील जमादार, प्रभूदास पोळ, महंमदअली लांडगे, रामचंद्र सदामते, गणपती निकम आदी सहभागी झाले. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे गणेश मडावी यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पाणीपुरवठाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदने दिली. बुधवारच्या (दि. ११) सर्वसाधारण सभेत मागण्यांविषयी निर्णय घेण्याची विनंती केली.