शिक्षकांचे वेतन सीपीएम प्रणालीद्वारे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:28 AM2021-04-20T04:28:18+5:302021-04-20T04:28:18+5:30

जत : जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे, शिक्षकांचे वेतन दोन-दोन महिने विलंबाने होत आहे. ...

Pay teachers through CPM system | शिक्षकांचे वेतन सीपीएम प्रणालीद्वारे करा

शिक्षकांचे वेतन सीपीएम प्रणालीद्वारे करा

Next

जत : जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे, शिक्षकांचे वेतन दोन-दोन महिने विलंबाने होत आहे. तरी शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीद्वारे करावे, अशी मागणी शिक्षक भारतीचे जत तालुकाध्यक्ष दिगंबर सावंत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे केली आहे.

राज्य शासनाने २०१३ पासून शिक्षकांचे वेतन १ तारखेला व्हावे म्हणून शालार्थ प्रणालीद्वारे वेतन देयके जमा करण्यास सुरुवात केली आहे. शासनाच्या धोरणानुसार वेतन देयके धनादेशविरहित करायची असल्याने भारतीय स्टेट बँकेशी करार करून जिल्हा कोषागारातून प्रत्यक्ष शिक्षकांच्या खात्यावर जमा होण्यासाठी सीएमपी कॅश मॅनेजमेंट प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रणालीद्वारे अदा होणारी रक्कम प्रत्यक्ष शिक्षकांच्या खात्यावर जमा होणार होती, त्यामुळे शिक्षकांचा पगार १ तारखेला होऊ शकतो, असा विश्वास दिगंबर सावंत यांनी व्यक्त केला आहे.

शिक्षण विभागाने शालार्थ प्रणाली अपडेट न केल्यामुळे तिचा वापर केवळ बजेट मागणीसाठी होत आहे. सीएमपी प्रणाली कुठेही कार्यान्वित नसल्याने बजेट असूनही पगार विलंबाने होत आहेत. राज्यात सेवार्थमध्ये सीएमपी प्रणालीचा वापर करून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होत आहे. याबाबतची मागणी यापूर्वी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरणाथे, सरचिटणीस कृष्णा पोळ, बालम मुल्ला, विकास वायदंडे, महेशकुमार चौगुले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व मुख्य वित्त लेखाधिकारी यांच्याकडे केली आहे.

चौकट

कपील पाटील यांचा पाठपुरावा

आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्याकडे शालार्थ प्रणाली अद्ययावत करून शिक्षकांचे वेतन १ तारखेला करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Pay teachers through CPM system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.