शिक्षकांचे पगार वेळेवर द्या : माळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:24 AM2021-01-22T04:24:39+5:302021-01-22T04:24:39+5:30
माडग्याळ : जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार वेळेवर होत नसून, वेळेवर पगार द्या, अशी मागणी शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष ...
माडग्याळ : जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार वेळेवर होत नसून, वेळेवर पगार द्या, अशी मागणी शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष श्रीकांत माळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून प्राथमिक शिक्षकांचे पगार वेळेत होत नाहीत. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. मुलांची शिक्षणाची फी, बँक हप्ते, घरभाडे आदी अडचणींना तोंड द्यावे लागते. शासन प्राथमिक शिक्षकांचेच पगार वेळेवर करत नाही. इतर खात्यांचे पगार वेळेवर होत असून शिक्षकांवरच का असा दुजाभाव केला जातो, हे समजत नाही. यापुढे शिक्षकांचे पगार वेळेत न झाल्यास जिल्ह्यातील सर्व संघटना मिळून आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. शेजारच्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार वेळेवर होत असताना, सांगली जिल्हयातच का पगार वेऴेवर होत नाहीत? प्राथमिक शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्नही बऱ्याच दिवसांपासून लाल फितीत अडकला आहे. तोही प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.