ग्रामविस्तार अधिकाºयांची वेतनवाढ रोखण्यात येणार : इस्लामपुरात ‘पीआरसी’चा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:17 AM2017-11-24T00:17:23+5:302017-11-24T00:46:05+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील ग्रामसेवकांची वादग्रस्त कार्यपध्दती आणि रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांबाबत विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली.
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील ग्रामसेवकांची वादग्रस्त कार्यपध्दती आणि रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांबाबत विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. समितीने याबाबत अधिकाºयांना धारेवर धरत कारवाईची विचारणा केली. ग्रामसेवकांच्या गैरवर्तनावरुन अधिकाºयांना धारेवर धरताना, ग्रामविस्तार अधिकाºयांची वेतनवाढ रोखण्याची शिफारसही केल्याचे समजते.
येथील पंचायत समितीला आमदार सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखालील विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने भेट दिली. सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजीराव पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, पं. स. सदस्य देवराज पाटील, जि. प. सदस्य संजीवकुमार पाटील यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले.
त्यानंतर सभागृहात आमदार पारवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली. यावेळी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या स्थानिक पदाधिकाºयांसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना गोपनीय बैठकीच्या नावाखाली बसता येणार नसल्याचे समिती सदस्यांनी स्पष्ट केले. फक्त समितीचे सदस्य आणि शासनाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, पंचायत समिती व बांधकाम विभागाचे तत्कालीन अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीस आमदार प्रवीण दरेकर, आमदार अमर राजूलकर, आमदार राहुल बोंद्रे, डॉ. देवराज भोई, विधानसभेचे उपसचिव विलास आठवले, माजी आमदार भगवानराव साळुंखे, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील उपस्थित होते.बैठकीनंतर सभापतींच्या दालनात समिती सदस्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सभापती हुलवान, उपसभापती नेताजी पाटील यांनी विविध मागण्या केल्या.
रखडलेल्या योजना : समिती नाखूश
बैठकीत तालुक्यातील ग्रामसेवकांच्या कार्यपध्दतीवरुन समिती सदस्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. ग्रामसेवकांवर कोणाचे नियंत्रण असते, अशी विचारणा करत, समितीने ग्रामविस्तार अधिकाºयांची वेतनवाढ रोखण्याची शिफारस केल्याची चर्चा होती. तालुक्यातील रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांबाबतही समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली.