राज्यात गुंडगिरी, पैशाचे राजकारणामुळे जनतेचा अपेक्षाभंग - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 02:00 PM2024-02-20T14:00:37+5:302024-02-20T14:01:33+5:30
शिरटे : सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड बहुमत असताना त्यांना राज्यातील जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. सध्या राज्यात गुंडगिरी आणि पैशाचे ...
शिरटे : सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड बहुमत असताना त्यांना राज्यातील जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. सध्या राज्यात गुंडगिरी आणि पैशाचे राजकारण सुरू आहे. राज्यातील जनतेत सरकारबद्दल प्रचंड नाराजी आणि असंतोष आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केले.
बहे (ता. वाळवा) येथे विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजनानिमित्त आयाेजित समारंभात ते बोलत होते. ‘राजारामबापू’चे माजी संचालक माणिकराव पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, नेर्लेचे सरपंच संजय पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने, सरपंच संतोष दमामे, उपसरपंच हनमंत पाटील, संचालक विठ्ठलराव पाटील, ‘कृष्णा’चे माजी संचालक अजित थोरात, बी.जी. पाटील, प्रा. शशिकांत पाटील, ॲड. कृष्णराव पाटील उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, राज्यातील जनतेत सरकारबद्दल प्रचंड नाराजी आणि असंतोष आहे. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये जे काही चालले आहे, ते सर्व जनतेला कळत आहे. लोकांना हे पसंत नाही. याचे उत्तर जनता मतपेटीतूनच देईन.
सरपंच संतोष दमामे यांनी स्वागत केले. याप्रसंगी बी.डी. पवार, बाळासाहेब पाटील, संदीप नरके, राहुल माने, संग्राम जाधव, देवराज देशमुख, संभाजी दमामे, अविनाश खरात, पोपट जगताप आदी उपस्थित होते. प्रकाश रसाळ, जयवंत काळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शशिकांत पाटील यांनी आभार मानले.