मॉडेल स्कूल उपक्रमासाठी लोकांनीही सहभाग द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:24 AM2021-03-26T04:24:56+5:302021-03-26T04:24:56+5:30
सांगलीत जिल्हा परिषदेतर्फे वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी अध्यक्षा प्राजक्ता कोरे, शिक्षण सभापती आशाताई पाटील, बांधकाम सभापती ...
सांगलीत जिल्हा परिषदेतर्फे वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी अध्यक्षा प्राजक्ता कोरे, शिक्षण सभापती आशाताई पाटील, बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मॉडेल स्कूल उपक्रमासाठी लोकांनीही सहभाग देण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी व्यक्त केले. वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.
यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती आशाताई पाटील, बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, सदस्य सुरेंद्र वाळवेकर, नितीन नवले, जितेंद्र पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे, शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोना स्थितीमुळे दोन वर्षांचे पुरस्कार एकत्र देण्यात आले. आशाताई पाटील म्हणाल्या की, ग्रामीण भागात गुणवत्तेची कमी नाही. त्याला प्रोत्साहन देण्याचे काम जिल्हा परिषद करेल. विशेषतः मुलींनी याचा फायदा घ्यावा.
यावेळी खेळाडू व प्रशिक्षकांचा गौरव झाला. पुरस्कार विजेते असे २०१९-२० : प्राजक्ता पवार - खो-खो, श्रेयस तांबवेकर - तलवार बाजी, प्रतीक्षा बागडी - कुस्ती, श्रेयस जाधव - खोखो, सोनाली जाधव - वुशू किक बॉक्सिंग, प्रीती बाणेकर - बॉक्सिंग, आशुतोष पवार - खो खो, नेहा शिंदे - व्हॉलीबॉल, हमजेखान मुजावर - क्रीडा प्रशिक्षक.
२०२०-२१ : योगेश्वरी कदम - जलतरण. सूरज लांडे - खो-खो. अक्षता होळकर - मैदानी खेळ. साहील मुजावर - कराटे, नेहा फाळके - तायक्वांदो, शंतनू शिंगाडे - तायक्वांदो, नीलम साळुंखे - व्हॉलीबॉल, मुक्ता लांडगे - जलतरण, अरुण रेळेकर - क्रीडा प्रशिक्षक.
चौकट
६५ शाळांत क्रीडाशिक्षक
जितेंद्र डुडी म्हणाले की, प्राथमिक शाळांत क्रीडा शिक्षक उपलब्धतेसाठी साताऱ्याच्या माणदेशी फाउंडेशनने सहकार्य केले. ६५ शिक्षकांना म्हणून मार्गदर्शन केले. त्यातील आठ जण मास्टर ट्रेनर होतील. एप्रिलमध्ये त्यांचे २५ दिवसांचे प्रशिक्षण होईल. जूनमध्ये शाळा सुरू होताच प्राथमिक शाळांत खेळांचे शिक्षण सुरू होईल.