जनता कर्फ्यूतून वेठीस धरू नये : शेखर माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 07:07 PM2020-09-10T19:07:58+5:302020-09-10T19:10:49+5:30
राज्य व केंद्र शासनामार्फत पूर्णपणे अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकले जात असताना सांगली महापालिका क्षेत्रात मात्र वारंवार कर्फ्यू पुकारला जात आहे. या माध्यमातून जनता व व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये. योग्य उपाय सोडून जनता संचारबंदीचाच पर्याय सारखा का वापरला जात आहे, असा सवाल माजी नगरसेवक शेखर माने यांनी उपस्थित केला. व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी सर्व पेठा सुरू राहणार असल्याचे जाहीर केले.
सांगली : राज्य व केंद्र शासनामार्फत पूर्णपणे अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकले जात असताना सांगली महापालिका क्षेत्रात मात्र वारंवार कर्फ्यू पुकारला जात आहे. या माध्यमातून जनता व व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये. योग्य उपाय सोडून जनता संचारबंदीचाच पर्याय सारखा का वापरला जात आहे, असा सवाल माजी नगरसेवक शेखर माने यांनी उपस्थित केला. व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी सर्व पेठा सुरू राहणार असल्याचे जाहीर केले.
माने यांनी कापड पेठ, गणपती पेठ, हरभट रोड, मारुती रोड येथील व्यापाऱ्यांशी याबाबत चर्चा केल्यानंतर पेठा सुरू ठेवण्याचा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला. याबाबत माने यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महापालिका क्षेत्र व जिल्ह्यात आनावश्यक कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आल्याने रुग्ण संख्या वाढत आहे.
त्यामुळे व्यापार व जनतेत भीतीचे वातावरण आहे. त्यांना आधार देण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेस व व्यापाऱ्यांना दहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आव्हान केले आहे, महापालिका क्षेत्र व ग्रामीण भागातील जनता, व्यापाºयांनी जनता कर्फ्यू मध्ये सहभागी न होण्याचे आवाहन आम्ही केले आहे.
या संदर्भात सांगली शहरातील मुख्य बाजारपेठेतील कापड पेठ, सराफ कट्टा, गणपती पेठ, हरभट रोड, सिंधी मार्केट, गणेश मार्केट व उपनगरांतील व्यवसायिकांशी या पार्श्वभूमी संवाद साधण्यात आला व्यापाऱ्यांच्यावतीने आम्ही कर्फ्यूस पूर्ण विरोध दर्शवित आहोत.
महापूर, कोरोना संकट व त्यामुळे लादले गेलेले लॉकडाऊन यामुळे कजार्चे हप्ते, कामगारांचा पगार, महापालिका व शासन टॅक्स विना व्यावसाय भरावा लागत आहे. त्यात पुन्हा दहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळला तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे.
जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन यांनी जनतेस व व्यापाऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. ऊलट जनता कर्फ्यू किंवा लॉकडाऊनच्या माध्यमातून वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. सर्व प्रथम जिल्हा प्रशासनाने व महापलिका प्रशासनाने गेल्या पाच महिन्यांपासून जनतेची आरोग्य व आर्थिक सुरक्षिततेची कोणती काळजी घेतली हे जाहीर करावे व मगच जनता कर्फ्यूचे आवाहन करावे.