जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:26 AM2021-04-08T04:26:27+5:302021-04-08T04:26:27+5:30
सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने कडक निर्बंध लागू केले असल्याने कोरोनाबाबत खबरदारी वाढली आहे. यामुळेच या आठवड्यात लसीकरणासाठीही ...
सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने कडक निर्बंध लागू केले असल्याने कोरोनाबाबत खबरदारी वाढली आहे. यामुळेच या आठवड्यात लसीकरणासाठीही जिल्ह्यात प्रतिसाद वाढतो आहे. त्यातच सध्या जिल्ह्यातील लसींचा साठा मर्यादित असून, नवीन लस उपलब्ध झाल्यानंतर आणखी लसीकरण वाढणार आहे.
गेल्या आठवड्यापर्यंत दिवसाला सरासरी ६ हजार लस घेत होते. त्यात तिप्पट वाढ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानेही लस घेण्याकडे कल वाढला आहे. शिवाय १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्यात येत असल्यानेही संख्या वाढत आहे. मात्र, सोमवारपासून जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे लसींचा मर्यादित साठाच उपलब्ध होता.
कोट
एक एप्रिलपासून गावातही लसीकरणाची सोय झाली आहे. मात्र, सध्या लस घेण्यास गर्दी असल्याने थोड्या दिवसांनी लस घेणार आहे. लसीबाबत कोणतेही गैरसमज नसून, उलट लस घेतलेले आरोग्यासाठी चांगलेच आहे. या आठवड्यात लस घेणार आहे.
छाया ढवळे
कोट
कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून लस घेण्यासही गर्दी होत आहे, तरीही मी लस घेणार आहे. सध्या निर्बंध कडक असल्याने बाहेर जाताना काळजी घ्यावी लागत आहे. या चार दिवसांत लस घेणार आहे.
मुबारक तांबोळी
कोट
कोरोनापासून बचावासाठी सध्यातरी लस एकच प्रभावी साधन आहे. त्यात आता लसीकरण केंद्रही वाढल्याने त्याचा उपयोग होत आहे. त्यानुसार, मी लस घेणार आहे. प्रशासनाकडून उलट प्रोत्साहन मिळत आहे.
प्रकाश कुलकर्णी
कोट
लसीकरणाबाबत कोणताही संभ्रम न ठेवता, प्रशासनाने अगदी आरोग्य उपकेंद्र स्तरावरही लसीकरणची सोय केली आहे. सध्या मर्यादित डोस उपलब्ध असले, तरी लवकरच पूर्ण साठा उपलब्ध होणार आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे.
डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी
चौकट
२७ मार्च ६,०१०
२८ मार्च ०००
२९ मार्च ३,१८५
३० मार्च ४,९४४
३१ मार्च ४,७७१
१ एप्रिल ६,१८१
२ एप्रिल १५,९५६
३ एप्रिल १४,८५५
४ एप्रिल १०,३९८
५ एप्रिल १९,०९७
६ एप्रिल १८,१२१
७ एप्रिल ----