आमराईत गार्डन ट्रेनला ‘स्थायी’ची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:23 AM2021-01-02T04:23:33+5:302021-01-02T04:23:33+5:30
आमराई उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी निंबाळकर यांनी पुढाकार घेतला होता. आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडेही पाठपुरावा केला. सध्या उद्यानातील मुख्य रस्ता डांबरी ...
आमराई उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी निंबाळकर यांनी पुढाकार घेतला होता. आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडेही पाठपुरावा केला. सध्या उद्यानातील मुख्य रस्ता डांबरी केला आहे. कारंजे व इतर सुविधासाठी ६० लाखांची निविदाही काढण्यात आली आहे. त्यासोबतच करमणुकीसाठी गार्डन ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर होता. त्याला सर्वच सदस्यांनी सभेत मंजुरी दिली. खासगी तत्त्वावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. ट्रेनसाठी रुळ, प्लॅटफार्म, उड्डाणपूल तयार करण्याची जबाबदारी ठेकेदाराची राहणार आहे. २९ वर्षांसाठी रेल्वे सुरू करण्यास परवानगी दिली जाणार असून प्रतिव्यक्ती २५ रुपये तिकीट दर असेल.
चौकट
झाडांना धक्का नाही
वर्ष निंबाळकर म्हणाल्या, उद्यानात २५०ते ३०० मीटर वर्तुळाकार जागेत रेल्वे ट्रॅक उभारला जाणार आहे. प्लॅटफॉर्म, उड्डाणपूलही तयार करण्यात येणार आहे. आमराईतील वृक्षांना धक्का न लावता हा प्रकल्प उभारला जाणार आहे.