सांगलीत गार्डन ट्रेनला स्थायीची मंजुरी  : खासगी तत्वावर प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 11:24 AM2021-01-02T11:24:34+5:302021-01-02T11:26:10+5:30

Muncipal Corporation Sangli- सांगली शहरातील आमराई उद्यानात खासगी तत्वावर गार्डन ट्रेन सुरू करण्यास शुक्रवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. या गार्डन ट्रेनसह उद्यानात एक कोटीची सुशोभिकरणाची कामे हाती घेतली असून वर्षभरात उद्यानाचे रुप पालटेल, असे नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी सांगितले.

Permanent approval for Sangli Garden Train: Experiment on private basis | सांगलीत गार्डन ट्रेनला स्थायीची मंजुरी  : खासगी तत्वावर प्रयोग

सांगलीत गार्डन ट्रेनला स्थायीची मंजुरी  : खासगी तत्वावर प्रयोग

Next
ठळक मुद्देसांगलीत गार्डन ट्रेनला स्थायीची मंजुरी  वर्षा निंबाळकर यांचा पाठपुरावा : खासगी तत्वावर प्रयोग

सांगली : शहरातील आमराई उद्यानात खासगी तत्वावर गार्डन ट्रेन सुरू करण्यास शुक्रवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. या गार्डन ट्रेनसह उद्यानात एक कोटीची सुशोभिकरणाची कामे हाती घेतली असून वर्षभरात उद्यानाचे रुप पालटेल, असे नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी सांगितले.

आमराई उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी निंबाळकर यांनी पुढाकार घेतला होता. आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडेही पाठपुरावा केला. सध्या उद्यानातील मुख्य रस्ता डांबरी केला आहे. कारंजे व इतर सुविधासाठी ६० लाखाची निविदाही काढण्यात आली आहे. त्यासोबतच करमणुकीसाठी गार्डन ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर होता. त्याला सर्वच सदस्यांनी सभेत मंजुरी दिली.

आमराईच्या सौंदर्यात भर पडेल, असा सर्वांनी विश्वास व्यक्त केला. खासगी तत्वावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. ट्रेनसाठी रुळ, प्लॅटफार्म, उड्डाणपुल तयार करण्याची जबाबदारी ठेकेदाराची राहणार आहे. २९ वर्षासाठी रेल्वे सुरू करण्यास परवानगी दिली जाणार असून प्रतिव्यक्ती २५ रुपये तिकीटदर असेल. प्रशासनाने अटी व शर्तीच्या आधीन राहून गार्डन ट्रेन सुरू करण्यात येणार आहे.

झाडांना धक्का नाही

वर्ष निंबाळकर म्हणाल्या, उद्यानात २५०ते ३०० मीटर वर्तुळाकार जागेत रेल्वे ट्रॅक उभारला जाणार आहे. प्लॅटफॉर्म, उड्डाणपूलही तयार करण्यात येणार आहे. आमराईतील वृक्षांना धक्का न लावता हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

Web Title: Permanent approval for Sangli Garden Train: Experiment on private basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.