पक्षाला बळ देणाऱ्यालाच लोकसभेची उमेदवारी हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:27 PM2018-12-21T23:27:22+5:302018-12-21T23:27:26+5:30

सांगली : काँग्रेस पक्षाला आणि कार्यकर्त्यांना बळ देणाºया, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणाºया निष्ठावंत कार्यकर्त्यालाच पक्षाने लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी ...

The person who has the strength of the party should get the candidature of the Lok Sabha | पक्षाला बळ देणाऱ्यालाच लोकसभेची उमेदवारी हवी

पक्षाला बळ देणाऱ्यालाच लोकसभेची उमेदवारी हवी

Next

सांगली : काँग्रेस पक्षाला आणि कार्यकर्त्यांना बळ देणाºया, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणाºया निष्ठावंत कार्यकर्त्यालाच पक्षाने लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी भूमिका युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. विश्वजित कदम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मांडली. लोकसभा निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणू. त्यासाठी ८ जानेवारीनंतर जिल्हाभरात फिरून पक्षबांधणी मजबूत करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आ. कदम म्हणाले की, राज्यासह देशभरात भाजप सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे. शेतकरी, कामगार, उद्योजक, व्यापारीवर्ग सरकारच्या धोरणांवर नाराज आहे. या सरकारच्या कारकीर्दीत कोणताच घटक समाधानी नाही. केवळ घोषणा करणाºया भाजप सरकारच्या काळात सर्वसामान्य भरडून निघत आहे. हा असंतोष नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांत उफाळून आला. त्यामुळे तेथे भाजपची पीछेहाट झाली, तर काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यारूपाने आश्वासक चेहरा समोर आल्याने काँग्रेसला भरभरून यश मिळाले. देशभरात भाजपविरोधी वातावरण तयार झाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला निश्चित चांगले यश मिळणार आहे.
ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवर काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देणाºया, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणाºया निष्ठावंतालाच पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी भूमिका आपण प्रदेश काँग्रेसच्या बैठकीतही मांडली आहे.
पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी स्वत: रस्त्यावर उतरून आंदोलने, मोर्चांमध्ये सहभागी होत आहेत. कार्यकर्त्यांना बळ देत आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. पक्ष मजबूत करत आहेत. त्याच पद्धतीने आम्हीही आंदोलनांमध्ये सहभागी होत आलो आहोत. घरात बसून उमेदवारी मागण्याचे आणि निवडून येण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. रस्त्यावर उतरून सामान्यांसाठी झगडणाºया आणि सामान्य कार्यकर्त्यांना पाठबळ देणाºयालाच पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली पाहिजे. मी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक नाही, हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. अर्थात पक्षाने दिलेल्या कोणत्याही उमेदवारासाठी जिवाचे रान करू आणि त्याला निवडून आणू.
येत्या ८ जानेवारीनंतर जिल्हाभरात फिरणार
आ. विश्वजित कदम म्हणाले की, ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम आणि मदन पाटील यांच्या आकस्मिक मृत्यूने काँग्रेस पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आपण स्वत: ८ जानेवारीनंतर जिल्हाभरात फिरून पक्षबांधणी मजबूत करण्यावर भर देणार आहोत. प्रत्येक तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते रिचार्ज होतील, अशादृष्टीने प्रयत्न करणार आहोत.
पलूस-कडेगावसाठी जादा वेळ
डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर पलूस-कडेगाव तालुक्यांतील कार्यकर्त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, लोकांना विकास कामांबाबत विश्वास देण्यासाठी मी तेथे जादा वेळ दिला. महिन्यातून पंधरा दिवस मतदारसंघात तळ ठोकून विकासकामे मार्गी लावली. विधानसभेच्या संपूर्ण मतदारसंघात फिरलो. गावा-गावांतील कार्यकर्त्यांना बळ दिले. त्यामुळे लोकांच्या मनात विश्वास निर्माण करू शकलो. आता तसा वेळ संपूर्ण जिल्ह्यासाठी देऊन, दौरे करून कार्यकर्त्यांना उभारी देणार आहे.

Web Title: The person who has the strength of the party should get the candidature of the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.