पेठ गावच्या विकासासाठी निधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:28 AM2021-05-19T04:28:36+5:302021-05-19T04:28:36+5:30
पेठ (ता. वाळवा) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतील पाण्याचे पूजन जि.प. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सम्राट ...
पेठ (ता. वाळवा) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतील पाण्याचे पूजन जि.प. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सम्राट महाडिक, जगन्नाथ माळी, निजाम मुलाणी, धनपाल माळी, विकास दाभाेळे, चंद्रकांत पवार उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ / इस्लामपूर : पेठ (ता.वाळवा) गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचे पूजन सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यसमिती सदस्य युवानेते सम्राट महाडिक, जि.प. बांधकाम सभापती जगन्नाथ माळी व जिल्हा परिषद सदस्य निजाम मुलाणी यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच यावेळी कोरे यांनी पेठ प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन विविध विकासकामांची माहिती घेतली. याचबरोबर, पेठमधील तिळगंगा नदीच्या सरक्षंण भिंतीची पाहणी केली.
प्राजक्ता कोरे म्हणाल्या, ११ कोटी रुपयांची ही पाणी योजना आहे. माजी मंत्री चंद्रकांत पाटील व आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली मंजुरी मिळालेली होती. पहिल्या टप्प्यातील पाणी पेठ गावापर्यंत पोहोचले असून, आता लवकरच अंतर्गत वितरण व्यवस्था होऊन ग्रामस्थांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळेल.
यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष धनपाल माळी, विकास दाभोळे, उपसरपंच चंद्रकांत पवार, डी.के कदम, अमिर ढगे, शंकर पाटील, आनंदराव कदम, राहुल पाटील, भानुदास गुरव, असिफ जकाते, विशाल शेटे, गोरख मदने, ग्रामसेवक एम.डी.चव्हाण उपस्थित होते.
चौकट
सरपंच मीनाक्षीताई महाडिक व जगन्नाथ माळी यांच्या पाठपुराव्यामुळे गावामध्ये नवीन आरोग्य केंद्र मंजूर झालेले आहे. १ कोटी २५ लाख रुपये खर्चून ग्रामसचिवालय होणार आहे. त्याचबरोबर, पेठ गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी ६० लाख रु.दलित वस्तीसाठी ५८ लाख रु. मंजूर झालेले आहे. ही विकास कामे तातडीने पूर्ण करून आणखी निधी पेठ गावच्या विकासासाठी देणार आहे, असेही प्राजक्ता कोरे म्हणाल्या.