संजयनगरमध्ये बंद पेट्रोल पंपाच्या टाकीतून पेट्रोल बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 PM2021-06-04T16:22:48+5:302021-06-04T16:37:49+5:30
Petrol Pump Sangli : सांगलीच्या संजयनगरमध्ये प्रभाग क्रंमाक ११ या ठिकाणी बंद असलेल्या पेट्रोल पंपाच्या टाकीतून पेट्रोल बाहेर येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती महापालिका मुकादम अमोल घनके यांनी अग्निशामन दलाला दिली. त्यानंतर मनपाच्या अग्निशामक विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन खबरदारीच्या सर्व उपाययोजना घेतल्या. पेट्रोल बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पेट्रोल पंपाच्या टाकीत दोनशे लिटर पेट्रोल शिल्लक असल्याचे खेराडकर यांनी सांगितले.
संजयनगर/सांगली : सांगलीच्या संजयनगरमध्ये प्रभाग क्रंमाक ११ या ठिकाणी बंद असलेल्या पेट्रोल पंपाच्या टाकीतून पेट्रोल बाहेर येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती महापालिका मुकादम अमोल घनके यांनी अग्निशामन दलाला दिली. त्यानंतर मनपाच्या अग्निशामक विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन खबरदारीच्या सर्व उपाययोजना घेतल्या. पेट्रोल बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पेट्रोल पंपाच्या टाकीत दोनशे लिटर पेट्रोल शिल्लक असल्याचे खेराडकर यांनी सांगितले.
संजयनगर येथील विरुपक्ष पेट्रोलपंप गेल्या डिसेंबर महिन्यापासून बंद आहे. मुकादम अमोल घनके हे प्रभागाची पाहणी करताना आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांना टाकीच्या व्हॉल्व्हमधून पेट्रोल बाहेर येत असल्याचे दिसले. घनके यांनी ही माहिती महापालिकेला कळवली. महापालिका कर्मचाऱ्यांनी याची माहिती अग्निशमन विभागाला दिल्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे आपल्या ताफ्यासह तातडीने दाखल झाले.
यावेळी संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासो पाटील,पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी व्हॉल्व्ह आणि आजूबाजूची पाहणी केली. पेट्रोल वर कसे येत असावे याबाबत तपासणी सुरू करण्यात आली. याचबरोबर इंडियन ऑइल डेपोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पाचारण करण्यात आले आहे. संजयनगर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बंद असलेल्या खेराडकर पेट्रोल पंपाच्या चेंबरमधून पाणी व पेट्रोल बाहेर काढण्याचे काम सुरु केले आहे.