जिल्ह्यात पेट्रोल नव्वदीपार पोहोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:20 AM2020-12-07T04:20:29+5:302020-12-07T04:20:29+5:30
सांगली : जिल्ह्यात पेट्रोलने नव्वदी पार केली असून डिझेलही ८० रुपयांवर गेले आहे. गेल्या आठवडाभरातील इंधनाची दररोजची दरवाढ वाहनचालकांसाठी ...
सांगली : जिल्ह्यात पेट्रोलने नव्वदी पार केली असून डिझेलही ८० रुपयांवर गेले आहे. गेल्या आठवडाभरातील इंधनाची दररोजची दरवाढ वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. गेले दोन-तीन महिने स्थिर असणारे इंधनाचे दर आठवडाभरापासून वाढायला सुरुवात झाली होती. दररोज दहा-वीस पैशांची दरवाढ सुरू होती. शनिवारी पेट्रोल ९० रुपयांवर पोहोचले. सांगलीसह पाच जिल्ह्यांना मिरज डेपोतून इंधन पुरवठा होतो. त्यामुळे मिरजेपासूनच्या अंतरानुसार पेट्रोलचे दर ८९ रुपये ८० पैशांपासून ९० रुपये ५० पैशांपर्यंत कमी-जास्त राहिले. १ डिसेंबरपासून दररोजच वाढ होत राहिली. डिझेलचा सांगलीतील दर ७८ रुपये ९१ पैसे होता. अंतरानुसार काही ठिकाणी ८० रुपयांपर्यंत राहिला.
पेट्रोलच्या दररोजच्या दरवाढीने वाहनचालकांचा खिसा हलका केला आहे. लॉकडाऊन काळात आर्थिक घडी विस्कटलेली असतानाच, दरवाढीच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असतानाही त्याचा फायदा ग्राहकांना मिळत नसल्याबद्दल संताप आहे.