सांगलीत पेट्रोल १०४ रुपयांवर तर डिझेल शंभरीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 12:12 PM2021-06-23T12:12:15+5:302021-06-23T12:15:10+5:30

Petrol Sangli : पेट्रोल आणि डिझेलची घोडदौड अजूनही सुरुच आहे. पेट्रोलने शंभरी ओलांडल्यानंतरही दरवाढ थांबण्याचे नाव घेईना, तर डिझेल शंभरीच्या दिशेने वाटचाल करु लागले आहे.

Petrol in Sangli at Rs 104 and diesel at Rs 100 | सांगलीत पेट्रोल १०४ रुपयांवर तर डिझेल शंभरीकडे

सांगलीत पेट्रोल १०४ रुपयांवर तर डिझेल शंभरीकडे

Next
ठळक मुद्देसांगलीत पेट्रोल १०४ रुपयांवर तर डिझेल शंभरीकडेग्राहकांना वाली उरला नाही

संतोष भिसे 

सांगली : पेट्रोल आणि डिझेलची घोडदौड अजूनही सुरुच आहे. पेट्रोलने शंभरी ओलांडल्यानंतरही दरवाढ थांबण्याचे नाव घेईना, तर डिझेल शंभरीच्या दिशेने वाटचाल करु लागले आहे.

वाहनचालकांसाठी ही महागाई कंबरडे मोडणारी ठरली आहे. पेट्रोलच्या किंमती शंभरी गाठल्यावर तरी स्थिर राहतील अशी अपेक्षा होती, पण अपेक्षा फोल ठरली आहे. मंगळवारी (दि. २२) पेट्रोल चक्क १०४ रुपयांवर पोहोचले. शंभर रुपयांच्या नोटेत ९६० मिली पेट्रोल मिळू लागले आहे. त्यामुळे वाहनचालक हबकले आहेत. सर्वसामान्यांचे पेट्रोलचा महिन्याचा खर्च आटोक्याबाहेर जात आहे. सांगलीत बुधवारी पेट्रोल प्रतिलिटर १०३.४३ रुपयांनी विकले जात होते. ग्रामिण भागात १०४ रुपयांपर्यंत पोहोचले होते.

स्पीड पेट्रोल प्रतिलिटर १०६.२८ रुपयांवर गेले आहे. ग्रामिण भागात १०७ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने पंपचालकांनी विक्री थांबवली असून साध्या पेट्रोलचीच विक्री सुरु आहे. डिझेलची घोडदौडदेखील वेगाने सुरु आहे. बुधवारी सांगलीतील दर ९४.०८ रुपये प्रतिलिटर असा होता. ग्रामिण भागात ९४. ५० रुपयांपर्यंत पोहोचले होते. मालवाहतुकदारांसाठी डिझेलची दरवाढ खुपच मोठी डोकेदुखी ठरली आहे. दरवाढीचा वेग पाहता लवकरच डिझेलदेखील शंभरी गाठण्याची चिन्हे आहेत.

ग्राहकांना वाली उरला नाही

लॉकडाऊन काळात उत्पन्न घटले असताना इंधन दरवाढीने खिसा हलका होऊ लागल्याने चिंतेत भर पडली आहे. तेल कंपन्या हजारो कोटी रुपयांचा नफा ग्राहकांच्या खिशातून वसूल करु लागल्या आहेत. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. यामध्ये ग्राहकांचेच मरण ओढवत आहे.

Web Title: Petrol in Sangli at Rs 104 and diesel at Rs 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.