सांगलीत रस्त्यांवर मुरुमांचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:33 AM2021-04-30T04:33:11+5:302021-04-30T04:33:11+5:30

माधवनगरजवळील नाकाबंदी नावाला सांगली : माधवनगर जकात नाक्याजवळ पोलिसांनी छावणी उभारून तपासणीची औपचारिकता पार पाडण्यास सुरुवात केली आहे. दररोज ...

Piles of pimples on Sangli roads | सांगलीत रस्त्यांवर मुरुमांचे ढीग

सांगलीत रस्त्यांवर मुरुमांचे ढीग

googlenewsNext

माधवनगरजवळील नाकाबंदी नावाला

सांगली : माधवनगर जकात नाक्याजवळ पोलिसांनी छावणी उभारून तपासणीची औपचारिकता पार पाडण्यास सुरुवात केली आहे. दररोज पोलिसांचे बॅरिकेट्स ओलांडून हजारो वाहने संचारबंदीचा नियम मोडत ये-जा करीत आहेत. त्यामुळे नाकाबंदी नावालाच असल्याचे दिसत आहे.

सांगलीच्या सिव्हिल चौकात गर्दी

सांगली : येथील सिव्हिल चौकात दररोज सकाळी १० ते ११ व सायंकाळी वाहनांची गर्दी होत आहे. चौकातून राम मंदिराकडे जाणारा रस्ता सध्या बंद असल्याने हा चौक अरुंद बनला आहे. त्यातच परिसरातील अतिक्रमणांमुळे कोंडी होते.

सांगलीत मोसंबीची आवक घटली

सांगली : मागणी असूनही मोठ्या प्रमाणावर मोसंबीची आवक घटली आहे. त्यामुळे मोसंबीचे दरही वाढत आहेत. संत्र्यांची आवक मोठी आहे, मात्र माेसंबी मिळत नसल्याचे दिसत आहे. बाजारात मोजक्याच फळविक्रेत्यांकडे मोसंबी विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत.

Web Title: Piles of pimples on Sangli roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.