ग्रह-ताऱ्यांचा मानवी जीवनावर परिणाम नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:41 AM2020-12-16T04:41:39+5:302020-12-16T04:41:39+5:30
इस्लामपूर : ग्रह-ताऱ्यांचा मानवी जीवनावर परिणाम होत नाही. आकाशाचे निरीक्षण करून अभ्यास केला पाहिजे. संस्कारक्षम वयातच खगोल विज्ञानाची आवड ...
इस्लामपूर : ग्रह-ताऱ्यांचा मानवी जीवनावर परिणाम होत नाही. आकाशाचे निरीक्षण करून अभ्यास केला पाहिजे. संस्कारक्षम वयातच खगोल विज्ञानाची आवड निर्माण झाल्यास देशात अनेक खगोल अभ्यासक, संशोधक तयार होतील, असे मत ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रा. डॉ. नितीन शिंदे यांनी व्यक्त केले.
येथील तक्षशीला ज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित आकाश निरीक्षणाचा कार्यक्रम झाला. प्रकाश कांबळे अध्यक्षस्थानी होते. संजय बनसोडे यांनी स्वागत केले. डॉ. शिंदे यांनी गुरू, शनी महायुतीबाबत मार्गदर्शन केले. ग्रह, तारे, नक्षत्रे, ग्रहणे, विविध खगोलीय घटना याची माहिती दिली. आकाश दर्शनाच्या कार्यक्रमात अबाल-वृद्धांनी सहभाग घेतला.
डॉ. अर्जुन पन्हाळे, प्रा.उत्तम वाघमारे, मनीषा भोसले, प्रा.अमोल चांदेकर, कपिल शिंदे, प्रा. पी. एच. पाटील, प्रशांत इंगळे उपस्थित होते. अवधूत कांबळे, जितेंद्र भिलवडीकर, योगेश कुदळे यांनी संयोजन केले. प्रा वसंत भंडारे यांनी आभार मानले.