पेठ येथे बार्टीच्या वतीने वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:19 AM2021-06-17T04:19:36+5:302021-06-17T04:19:36+5:30
पेठ (ता. वाळवा) येथे बार्टीच्या उपक्रमात कृष्णात पिंगळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जगन्नाथ माळी, चंद्रकांत कांबळे, धनपाल ...
पेठ (ता. वाळवा) येथे बार्टीच्या उपक्रमात कृष्णात पिंगळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जगन्नाथ माळी, चंद्रकांत कांबळे, धनपाल माळी, अंकुश चव्हाण उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना समजले आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी काढले.
पेठ (ता. वाळवा) येथे पिंगळे यांच्या हस्ते मुुबलक ऑक्सिजन देणाऱ्या वड, पिंपळ, लिंब, चिंच अशा वृृक्षांचे रोपण करण्यात आले. बार्टीचे महासंचालक धम्मदीप गजभिये यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. उपसरपंच चंद्रकांत कांबळे यांनी वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, कृषी सहायक एच. ए. कांबळे, धनपाल माळी उपस्थित होते. बार्टीचे योजनाप्रमुख मेघराज भाते, जिल्हा प्रकल्पाधिकारी गणेश सव्वाखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत अंकुश चव्हाण, विक्रांत शिंदे यांनी संयोजन केले.