तानाजीराव मोरे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 12:49 PM2021-07-08T12:49:20+5:302021-07-08T12:52:13+5:30
environment Sangli : रोटरी क्लब ऑफ सांगलीचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव मोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लबच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.
सांगली : रोटरी क्लब ऑफ सांगलीचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव मोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लबच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.
रोटरी क्लबच्या परिसरात हा उपक्रम घेण्यात आला. तानाजीराव मोरे हे वृक्षप्रेमी होते. वनअधिकारी पदावरही त्यांनी काम केले होते. मराठा समाजाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले सामाजिक कार्य लोकांना भावले. त्यामुळे त्यांना सामाजिक उपक्रमातून आदरांजली वाहण्याचा निर्णय रोटरी क्लबने घेतला.
वृक्षारोपण करुन तानाजीराव मोरे यांच्या वृक्षप्रेमाचे स्मरण यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर क्लबच्यावतीने त्यांच्या स्मरणार्थ २०२१-२२ या वर्षासाठी आकार प्रतिष्ठानमधील एकच पालक असलेल्या चार विद्यार्थीनींचा शिक्षण व आरोग्याचा सर्व खर्च करण्यात येणार आहे.
वृक्षारोपण कार्यक्रमावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. भास्कर ताम्हणकर, सलील लिमये, रामकृष्ण चितळे, प्रमोद पाटील, उदय पाटील, अभिनंदन पाटील, गिरीश तगडी, समीर गाडगीळ, मनिष मराठे, अजय शहा, अमोल कुलकर्णी उपस्थित होते.