सोनहिरा कारखान्यावर पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:09+5:302021-06-06T04:20:09+5:30
वांगी : वांगी (ता. कडेगांव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कारखान्याचे अध्यक्ष ...
वांगी : वांगी (ता. कडेगांव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मोहनराव कदम म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.
सामाजिक वनीकरण विभागातर्फे सवलतीच्या दरात विविध प्रकारच्या रोपांची विक्री केली जाते. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन आपल्या पडिक जागेत तसेच बांधावर वृक्षारोपण करून त्यांची जोपासना करावी. राजकीय, सामाजिक, औद्योगिक तसेच सहकारी क्षेत्रातील सर्व संस्थांनी प्रतिवर्षी वृक्षारोपण करून त्यांची जोपासना करावी. प्लास्टिकसदृश कोणतीही गोष्ट आपल्या दैनंदिन जीवनात वापरू नये. त्यामुळेदेखील पर्यावरणाचे संतुलन राखले जाणार आहे.
यावेळी कारखान्याचे पर्यावरण अधिकारी नंदकुमार सूर्यवंशी, चीफ केमिस्ट प्रकाश देशमुख, डिस्टीलरी प्रमुख अर्जुन जगदाळे, को-जनरल मॅनेजर नवनाथ सपकाळ, अनिल सूर्यंवशी, भीमराव पोळ आदी उपस्थित होते.
फाेटाे : ०५ वांगी २