पंढरपूर रोड स्मशानभूमीत वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:30 AM2021-05-25T04:30:14+5:302021-05-25T04:30:14+5:30
सांगली : मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत टायगर ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. सध्या या स्मशानभूमीत कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जात ...
सांगली : मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत टायगर ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. सध्या या स्मशानभूमीत कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहे. त्याचा ठेका टायगर ग्रुपकडे आहे. या ग्रुपच्या वतीने डॉ. तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
----------
विश्रामबाग रेल्वे स्टेशनमध्ये पादचारी पूल करावा
सांगली : विश्रामबाग रेल्वे स्टेशनमध्ये वारणाली परिसरातून जाण्यासाठी पादचारी पूल करावा, अशी मागणी नगरसेविका सोनाली सागरे यांनी खासदार संजय पाटील, मिरज रेल्वे अधिकारी तसेच पुणे रेल्वे प्रबंधक विभागाकडे केली. सध्या या मार्गावर दुहेरीकरण, विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. स्टेशनमध्ये येण्यासाठी विजयनगरहून जावे लागते. त्यासाठी पादचारी पूल आवश्यक आहे.
---------
रुक्मिणी मार्केटमधील रस्त्याचे काम पूर्ण
सांगली : वालनेसवाडी परिसरातील रुक्मिणी मार्केट येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले. प्रभाग समिती दोनच्या सभापती नगरसेविका अप्सरा वायदंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेमधून रस्त्यासाठी निधी मंजूर झाला होता. यावेळी सुंदर आवळे, राजीव वायदंडे, अजिम मुल्ला, अक्रम मुल्ला, सनी आवळे, देवदास कांबळे उपस्थित होते.
-------------