इस्लामपुरात पोलीस मैदानावर नक्षत्र वृक्षाचे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:35 AM2021-02-27T04:35:35+5:302021-02-27T04:35:35+5:30
इस्लामपूर येथील पोलीस कवायत मैदानावर रूपाली पिंगळे, सुकेशिनी देशमुख, सुनीता संपकाळ यांच्याहस्ते नक्षत्र वृक्षांचे रोपण करण्यात आले. लोकमत न्यूज ...
इस्लामपूर येथील पोलीस कवायत मैदानावर रूपाली पिंगळे, सुकेशिनी देशमुख, सुनीता संपकाळ यांच्याहस्ते नक्षत्र वृक्षांचे रोपण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील रामकृष्णहरी वॉकिंग ग्रुपतर्फे पोलीस कवायत मैदानावर तीस नक्षत्रांच्या रोपांचे वृक्षारोपण आणि २०० भगवद्गीता ग्रंथाचे वाटप करण्यात आले. रूपाली कृष्णात पिंगळे, सुकेशिनी नारायण देशमुख, बांधकाम सभापती सुनीता संकपाळ, नगरसेविका संगीता कांबळे, अर्चना संजय पाटील, रोजा किणीकर, इंदुताई शेलार, सुजाता जाधव, तेजश्री काईंगडे, पूजा माने, प्रणाली वडार, रसिका हवालदार यांच्याहस्ते या नक्षत्र वृक्षांचे रोपण करण्यात आले.
छाया शिरोळे यांनी उपस्थित सर्वांना हरित वृक्षारोपण शपथ दिली. रुपाली पिंगळे यांनी वॉकिंग ग्रुपच्या कार्याचे कौतुक करून २०० भगवद्गीता ग्रंथ वाटून समाजात आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गार काढले.
या वॉकिंग ग्रुपच्यावतीने गेल्या वर्षभरापासून पोलीस कवायत मैदानावर २५० तुळशीची रोपे लावून ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. आतापर्यंत मैदानाभाेवती ३०० हून अधिक झाडे लावून ती जगविण्यात आली आहेत. सकाळी आणि सायंकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिक आणि महिलांकरिता वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे.
नंदिनी पाटील, आशा मोहिते, रंजना मंडलिक, मंगल पाटील, सीमा पाटील, नंदा वडार, तेजा पाटील, संस्कृती पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.