प्लॅस्टिकवर बंदी म्हणजे असून अडचण, नसून..! पर्याय न देताच बंदी : निर्णयावर हवा सकारात्मक विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:47 AM2018-04-05T00:47:39+5:302018-04-05T00:47:39+5:30
सांगली : राज्य शासनाने संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक बंदी जाहीर केली आणि निर्णयाच्या स्वागताबरोबरच संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. पर्यावरणप्रेमींनी त्याचे स्वागत केले,
शरद जाधव ।
सांगली : राज्य शासनाने संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक बंदी जाहीर केली आणि निर्णयाच्या स्वागताबरोबरच संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. पर्यावरणप्रेमींनी त्याचे स्वागत केले, तर व्यापाऱ्यांनी त्यावर नापसंती व्यक्त केली. व्यापाºयांचा प्लॅस्टिक बंदीला विरोध नसला तरी, त्याला पर्याय द्या आणि मगच बंदी घाला, अशी मागणी केली आहे. प्लॅस्टिक पिशव्यांची सर्वाधिक गरज असलेल्या किरकोळ विक्रेत्यांच्या अडचणींचा विचार करत त्यांना पर्याय आणि प्लॅस्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी यावर निर्णयाचे यश अवलंबून आहे.
प्लॅस्टिकचा बेसुमार वापर व त्यामुळे पर्यावरणाचा होत असलेला ºहास यावर चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे यापूर्वी तीन वेळा प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली असली तरी, त्याच्या अंमलबजावणीला अनेक कारणांनी खोडा बसत होता. काही घटकांनी निर्णयाचे स्वागतही केले, तर व्यापारी, विक्रेते, उत्पादकांनी मात्र नाराजी व्यक्त केली. प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय असणाºया कागदी अथवा कापडी पिशव्यांचा विषय समोर आला. त्याच्या उत्पादनात आता तरी मर्यादा असल्याने अनेक किरकोळ विक्रेत्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. किरकोळ विक्रेत्यांना लागणाºया प्रमुख साधनांत या पिशव्या असूनल त्यांना पर्याय उपलब्ध करून देण्याचे आव्हान शासनासमोर आहे.
याठिकाणी होतो : पिशव्यांचा वापर
किराणा दुकान, भाजीपाला विक्रेते, मटण, चिकन यासह अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होतो. मटण, चिकन, मासे आदीमध्ये तर प्लॅस्टिक पिशव्यांमुळे माल व्यवस्थित राहत असल्याचा दावा विक्रेते करत आहेत. तरीही प्लॅस्टिक पिशव्यांचे दुष्परिणामही लक्षात घ्यावेतॉ, अशी अपेक्षा काहीजण व्यक्त करत आहेत.
प्लॅस्टिक पिशवी काही सेकंदात तयार होते, तर ती नष्ट करण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागत असल्याने, आता समाजातील सर्वच घटकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा व इतर वस्तूंचा सोस सोडणे आवश्यक बनले आहे. प्लॅस्टिक पिशवी कितीही सोयीची असली तरी, शेवटी आपण स्वत:च पर्यावरणाच्या हानीला कारणीभूत ठरत आहोत, हेही विसरून चालणार नसल्याने शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करत, जेवढा होता होईल तेवढा प्लॅस्टिकचा वापर कमी करणे नागरिकांच्याच हाती आहे. किरकोळ विक्रेत्यांना मालाच्या पॅकिंगसाठीही नवा आणि सुलभ पर्याय दिला, तरच सर्व घटकांकडून या निर्णयाचे स्वागत होणार आहे.