गारपिटीपासून द्राक्षबागांच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हर, राज्य शासन देणार अनुदान 

By अशोक डोंबाळे | Published: June 30, 2023 05:40 PM2023-06-30T17:40:32+5:302023-06-30T17:44:53+5:30

द्राक्षाच्या नुकसानीसह औषध फवारणीचा खर्चही होणार कमी

Plastic cover for protection of vineyards from hail, State Govt to provide subsidy | गारपिटीपासून द्राक्षबागांच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हर, राज्य शासन देणार अनुदान 

गारपिटीपासून द्राक्षबागांच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हर, राज्य शासन देणार अनुदान 

googlenewsNext

सांगली : अवकाळी पाऊस व गारपिटीपासून द्राक्षबागांचे संरक्षण होण्याकरिता प्लास्टिक कव्हरसाठी एकरी दोन लाख ४० हजार ६७२ रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून, द्राक्षबागांचे नुकसान टाळणे शक्य होणार आहे. औषध फवारणीचा खर्चही कमी होणार असल्याचे द्राक्ष उत्पादकांचे मत आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून प्लास्टिक कव्हरसाठी अनुदान मिळण्यासाठी नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर व सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली जाणार आहे. या अनुदानासाठी शासनाने ‘महाडीबीटी’च्या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज मागविले आहेत. अर्ज किती येतील, त्यावर लाभार्थींची निवड कशा पद्धतीने करायची ते धोरण कृषी विभाग ठरविणार आहे. 

या योजनेसाठी खर्चाचे मापदंड प्रतिएकर चार लाख ८१ हजार ३४४ रुपये इतका निश्चित केला आहे. प्रतिलाभार्थी २० गुंठे ते एक एकरदरम्यान लाभ देण्यात येणार आहे. मात्र, अनुदान मर्यादा खर्चाच्या ५० टक्के किंवा प्रतिएकर दोन लाख ४० हजार ६७२ रुपये असेल, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Plastic cover for protection of vineyards from hail, State Govt to provide subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.